तरुण भारत

मल्लिकार्जुननगर येथे घरफोडीत किमती ऐवज लंपास

मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी सुमारे 2 लाखाचा ऐवज पळविला आहे. रविवारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून मल्लिकार्जुन नगर येथे ही घटना घडली आहे. मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

चंद्रगौडा बसगौडा पाटील यांनी फिर्याद दिली आहे. चोरटय़ांनी दर्शनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून 42 ग्रॅम सोने, 55 ग्रॅम चांदीचे दागिने, 3 हजार रुपये रोख रक्कम, दोन एटीएम कार्ड पळविले आहेत. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

चंद्रगौडा व त्यांचे कुटुंबिय दि. 25 डिसेंबर रोजी सकाळी आपल्या घराला कुलूप लावून दांडेलीला गेले होते. मध्यरात्रीनंतर चोरीचा प्रकार घडल्याचा संशय आहे. दुसऱया दिवशी 26 डिसेंबर रोजी चोरीची घटना उघडकीस आली आहे. चंद्रगौडा यांच्या भावाने ही घटना कळविली. त्यानंतर ते बेळगावात दाखल झाले.

या प्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

पहिल्याच पावसाने उडविली दाणादाण

Patil_p

किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद

Amit Kulkarni

कोरोनाबाधितांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱयांवर कारवाई होणार

Patil_p

केवळ 40 जणांनाच विवाहासाठी परवानगी

Amit Kulkarni

दुसऱया दिवशीही बेळगाव जिल्हय़ाला दिलासा

Patil_p

शहापूर मंगाई देवीचा वाढदिवस सोहळा साजरा

Patil_p
error: Content is protected !!