तरुण भारत

बिजगर्णी, बेळवट्टी ग्रा.पं.साठी चुरशीने मतदान

बिजगर्णी ग्रामपंचायतीसाठी 92 टक्के तर बेळवट्टी ग्रामपंचायतीसाठी 81 टक्के मतदान : मतदारांमध्ये उत्साह

वार्ताहर /किणये

Advertisements

बिजगर्णी, बेळवट्टी ग्राम पंचायतींची निवडणूक सोमवारी चुरशीने झाली. सोमवारी सकाळी 7 वाजता मतदान केंद्रांवर मतदानासाठी लागणाऱया साहित्याचे पूजन करून मतदानाला सुरुवात झाली. कामगारांनी सकाळीच मतदान करुन ते कामावर निघून गेले. काही शेतकरी तसेच बेळगावला बाजार व इतर कामांसाठी जाणाऱया मतदारांनीही सकाळीच मतदान केंद्रावर गर्दी केली होती. यामुळे दोन्ही ग्राम पंचायतींच्या कार्यक्षेत्रात सकाळच्या सत्रात अधिक मतदान झाले. बिजगर्णी ग्राम पंचायतीसाठी 92 टक्के तर बेळवट्टी ग्राम पंचायतीसाठी 81 टक्के मतदान झाले.

पहिल्यांदाच दोन्ही ग्राम पंचायतींची निवडणूक अत्यंत चुरशीने व अटीतटीची झाले. यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक अन् निकाल याकडे पश्चिम भागातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोरोनामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीनुसारच मतदानाची प्रक्रिया सुरू होती. मतदान केंद्रांवर येणाऱया प्रत्येक मतदाराचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येत होते. तसेच सॅनिटायझर व मास्कचा उपयोग करण्यात येत होता. मतदान करण्याच्या घाईगडबडीत काही जण मास्क विसरून येत होते. मात्र, मास्कशिवाय मतदान केंद्रांमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. यामुळे मास्कचा वापर झाला असल्याचे दिसून आले.

आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, ग्राम पंचायत कर्मचारी मतदान केंद्रांवर उपस्थित होते. प्रशासनाच्या नियमावलीनुसारच मतदारांना मतदानासाठी सोडण्यात येत होते. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त होता. बेळवट्टी व बिजगर्णी ग्राम पंचायतींच्या कार्यक्षेत्रात येणाऱया गावागावांमध्ये जाऊन पोलीस पाहणी करीत होते.

नागरिकांचे सवडीनुसार मतदान

ग्रामीण भागात सध्या सुगी हंगाम अंतिम टप्प्यात आहे.मात्र, बहुतांशी गावांमध्ये सोमवारचा दिवस वार पाळणूक केली जाते. यामुळे दोन्ही पंचायतीमधील शेतकरी मतदारांनी आपापल्या सवडीनुसार मतदानाचा हक्क बजावला तर काही शेतकरी मतदान करून चारा आणण्यासाठी जातानाचे चित्र पहावयास मिळाले.

दिव्यांगांसाठी व्हिलचेअरची सोय

टेम्पो, दुचाकी, कारगाडी व इतर वाहनांमधून मतदारांची ने-आण करण्यात येत होती. उमेदवारांचे समर्थक मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदान करण्यासाठी सांगत होते. वयोवृद्ध महिला-पुरुषांना वाहनांमधून मतदान केंद्रापर्यंत आणत होते. दिव्यांगांना आणण्यासाठी खास व्हिलचेअरची सोय केली होती. या व्हिलचेअरचा वापरही काही ठिकाणी करण्यात आला.

 बिजगर्णी ग्राम पंचायतीमध्ये बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप, यळेबैल या गावांचा समावेश आहे. यंदाची निवडणूक अतिशय रंगतदार झाली असल्याची माहिती स्थानिक मतदारांनी दिली. अलीकडे प्रशासनातर्फे ग्राम पंचायतीमधून विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमध्ये वाढ होत असल्याने आपण ग्राम पंचायत सदस्य होऊन नागरिकांची सेवा करू, असा काही जणांनी चंग बांधला असल्याने निवडणूक चुरशीची झाली आहे.

 बिजगर्णी गावात दोन वॉर्ड आहेत. सकाळी 10 वाजेपर्यंत वॉर्ड क्र. 1 मध्ये 167 पुरुष व 96 महिला मतदारांनी तर वॉर्ड क्र. 2 मध्ये 161 पुरुष व 103 महिला मतदारांनी मतदान केले होते. दुपारी 4 वाजेपर्यंत बिजगर्णीतील वॉर्ड क्र. 1 मध्ये 837 मतदारांनी मतदान केले. वॉर्ड 2 मध्ये 836 मतदान झाले होते. वॉर्ड 1 मध्ये 980 पैकी 901 मतदारांनी मतदान केले. तर वॉर्ड 2 मध्ये 1025 पैकी 942 इतके मतदान झाले असून बिजगर्णी ग्राम पंचायतीबरोबरच बिजगर्णी गावामध्येही 92 टक्के मतदान झाले.

कावळेवाडीत शांततेत 92 टक्के मतदान

कावळेवाडी गावात शांततेत 92 टक्के मतदान झाले आहे. गावात 2 जागा आहेत. यामधील ओबीसी जागेसाठी दोन उमेदवारांमध्ये लढत झाली असून सामान्य पुरुष या एका जागेसाठी 4 तगडय़ा उमेदवारांमध्ये अटीतटीची निवडणूक झाली आहे. सकाळी 10.50 पर्यंत 135 पुरुष व 74 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सायंकाळी 5 पर्यंत जास्तीत जास्त मतदान झाले होते. सायंकाळी 6 पर्यंत एकूण 631 मतदानांपैकी 578 मतदारांनी मतदान केले.

राकसकोप येथे 90 टक्के

राकसकोप येथे सकाळी 11.15 पर्यंत 395 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. गावातील 3 जागांसाठी 6 उमेदवार रिंगणात आहेत. दुपारी धीम्या गतीने मतदान झाले. एकूण 897 मतदानांपैकी 809 जणांनी मतदान केले असून 90 टक्के मतदान झाले आहे.

यळेबैल 93 टक्के मतदान

यळेबैल गावात चुरशीने 93 टक्के मतदान झाले. सकाळी 11.15 पर्यंत 270 इतके मतदान झाले होते. या मतदान केंद्रावरही सकाळच्या वेळेत गर्दी होती. एकूण 614 पैकी 570 मतदारांनी हक्क बजावला.

 बेळवट्टी ग्राम पंचायतीमध्ये 81 टक्के मतदान झाले. मागील दोन वेळेच्या निवडणुकांमध्ये बेळवट्टी ग्राम पंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. यंदा निवडणूक झाली असल्याने पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱया बेळवट्टी, बाकनूर, इनाम बडस, धामणे (एस) या गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच गाजली आहे.

 बेळवट्टी ग्रा. पं. त सहा जागा बिनविरोध

बेळवट्टी ग्राम पंचायतीमध्ये 11 जागा आहेत. यातील 6 जणांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित 6 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. या 12 उमेदवारांचे भवितव्य सोमवारी पेटीबंद झाले असून या उमेदवारांना व समर्थकांना  दि. 30 रोजीच्या निकालाची उत्सुकता आहे.

बेळवट्टी गावात वॉर्ड एकच असून दोन बुथची व्यवस्था करण्यात आली होती. यातील बुथ क्र. 366 मध्ये सकाळी 10.30 पर्यंत 130 पुरुष व 100 महिला मतदारांनी मतदान केले होते. बुथ क्र. 366-ए मध्ये 10.30 पर्यंत 133 पुरुष व 112 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण 1279 पैकी 1086 इतके मतदान झाले असून 85 टक्के झाले आहे. बेळवट्टी गावात तीन जागा बिनविरोध आहेत तर एका जागेसाठी तगडी निवडणूक झाली असल्याचे दिसून येते.

 बाकनूर गावात 90 टक्के मतदान झाले आहे. 2 जागांसाठी 4 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 11.30 पर्यंत 250 मतदारांनी मतदान केले होते. एकूण 588 पैकी 528 जणांनी मतदान केले. सोमवारी वार पाळणूक असल्याने दिवसभर अगदी सुरळीतपणे मतदान सुरू होते.

इनाम बडस 69 टक्के मतदान

इनाम बडस येथे सकाळी 11 पर्यंत 250 मतदारांनी मतदान केले होते. काही मतदार ओळखपत्र न आणता आले होते. या मतदारांना मतदान करता आले नाही, अशी माहिती स्थानिकांनी दिली. 69 टक्के मतदान झाले असून 908 पैकी 628 जणांनी मतदानाचा हक्क बजावला
आहे.

बिजगर्णी ग्राम पंचायत 92 टक्के मतदान

गावएकूण जागाबिनविरोधरिंगणातील उमेदवारएकूण मतदानझालेले मतदान
बिजगर्णी वॉर्ड क्र. 139980901
बिजगर्णी वॉर्ड क्र. 2481025942
कावळेवाडी26631578
राकसकोप36897809
यळेबैल213614571
एकूण1413241473801

बेळवट्टी ग्राम पंचायत 81 टक्के मतदान

गावजागाबिनविरोधरिंगणातील उमेदवारएकूण मतदानझालेले मतदान
बेळवट्टी43212791086
बाकनूर314588528
इनाम बडस316908628
धामणे एस11
एकूण1161227752242

Related Stories

रविवारीही शहर परिसरात शांतता

Amit Kulkarni

बीएड् प्रवेशावरून आरसीयू कुलगुरु नरमले

Patil_p

हजार रुपयांच्या टोकनवर रेल्वेमार्गाची बोळवण

Patil_p

सोमवारी ग्रामीण, उत्तर-दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचा प्रचार

Amit Kulkarni

बुधवारी 1006 पॉझिटिव्ह; 17 जणांचा मृत्यू

Amit Kulkarni

कसाई गल्लीतील फिश मार्केटवर मनपाचा ताबा

Patil_p
error: Content is protected !!