तरुण भारत

कागलच्या जनतेने आणि पवार साहेबांनी मला झोळी फाटेपर्यंत दिलं – मंत्री मुश्रीफ

ग्राम विकास मंत्री मुश्रीफ यांचा मंडलिकांना टोला

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

मी मंत्रिमंडळात पंधरा वर्षे आहे आणि आता महाविकास आघाडीमध्ये दोन वर्षे आहे. आता मला कुणी दिलं असेल तर कागल तालुक्यातील जनतेने माझे नेते पवार साहेबांनी भरभरुन दिलेल आहे. खासदार संजय मंडलिक यांच्या वक्तव्यावर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी टोला लगावला आहे.

ते म्हणाले ,2014ला विधानसभेची निवडणूक झाली काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार अधिक निवडून येऊ शकले नाहीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होती त्यांची संख्या अधिक होती पण उद्धव ठाकरेंना अमित शहा यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा दिलेला शब्द पाळला नाही म्हणून उद्धव ठाकरे पवार साहेब, सोनिया गांधीच्या सहकार्यांने मुख्यमंत्री झाले आणि दोन वर्षे आता या मंत्रिमंडळात आहे. त्यामुळे कागल तालुक्यातील जनतेने आणि पवार साहेबांनी झोळी फाटेपर्यंत आम्हाला दिलेल आहे. मी थोडे निर्णय घ्याला कचरलो असे काही जण म्हणाले ते खरं आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे.

नऊ वर्षांत लोकांचे हाल झालेले आहेत. जर आमच्या आमच्यातच पॅनल झाली आणि भाषणे झाली आणि बँकेची बदनामी होईल. त्याचा फार मोठा परिणाम होईल म्हणून बँकेच्या हितासाठी निर्णय घ्यायला कचरलो असे मुश्रीफ म्हणाले तर संजय मंडलिक यांच्या पत्रांनी शाहू कारखाना बिनविरोध केल्याचे सांगितले.

Related Stories

कुंभी कासारी परिसरात ‘भारत बंद’ला चांगला प्रतिसाद

Abhijeet Shinde

पन्हाळा पोलिसांची कापड दुकानासह विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

Abhijeet Shinde

कसबा सांगाव येथे अतिक्रमण हटाव मोहिम सुरु, एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Abhijeet Shinde

कालकुंद्रीकरांमुळे ‘तो’ तरुण पोहोचला स्वगृही

Abhijeet Shinde

गडमुडशिंगीत तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; पाच जण ताब्यात

Sumit Tambekar

सोमवारी निम्म्या कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!