तरुण भारत

राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश

प्रतिनिधी / कोल्हापूर

राधानगरी धरणाच्या इमर्जन्सी गेटला 29 डिसेंबर रोजी सकाळी दरवाज्याचे तांत्रिक काम करत असताना दरवाजा उघडून अडकला होता. तांत्रिक बिघाड झाल्याने धरणाचे इमर्जन्सी गेट तब्बल 18 फुट खुले झाले होते, त्यामुळे भोगावती नदी पात्रात वेगाने पाणी पातळी वाढली होती. मात्र धरणाचा दरवाजा बंद करण्यात आज दुपारी 3.15 च्या दरम्यान जलसंपदा विभागाला यश आले आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली. त्यामुळे नद्यांकाटी असणाऱ्या गावांनी आता सुटकेचा निश्वास सोडला आहे.

आज सकाळी साडे नऊच्या दरम्यान राधानगरी धरणाच्या गेटच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना अपघाताने सर्व्हिस गेट खुले झाले होते. यामुळे नदीपात्राची पाणी पातळी वाढत होती. नदीकाठच्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा दिला होता. जलसंपदा विभागाच्या अथक परिश्रमानंतर राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात आला आहे.

Advertisements

Related Stories

माहेरहून पंधरा लाख रुपये आणले नाहीत म्हणून विवाहितेचा छळ

Abhijeet Shinde

पुलाची शिरोली ग्रामपंचायत सदस्या सुरेखा चव्हाण यांचा जातीचा दाखला अपात्र

Abhijeet Shinde

रस्त्यावर थुंकणाऱ्याला अटक

Abhijeet Shinde

`करवीर तहसिल’कार्यालयासाठी 14 कोटी 98 लाख निधी मंजूर

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सरवडेत गॅलरीचा स्लॅब कोसळून सेंट्रिंग कामगाराचा मृत्यू

Abhijeet Shinde

बिद्री-मुधाळतिट्टा रस्त्यावर ऊसाचा ट्रॅक्टर पलटी होऊन अपघात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!