तरुण भारत

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस

कणकवली / प्रतिनिधी-

सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख व शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ल्याप्रकरणी संशयित म्हणून नाव असलेले आमदार नितेश राणे कुठे आहेत? या प्रश्नावर श्री. राणे यांनी दिलेल्या उत्तरामुळे कणकवली पोलिसांनी राणे यांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

Advertisements


याप्रकरणी संशयित म्हणून नाव असलेले आमदार नितेश राणे यांचा शोध पोलिस घेत आहेत. तर नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी नितेश राणे कुठे आहेत याबाबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारले असता त्यांनी नितेश कुठे आहे हे सांगायला मी मूर्ख आहे काय ? असा प्रतिसवाल पत्रकारांना केला होता. तसेच यापूर्वीही श्री राणे यांनी आमदार नितेश राणे सिंधुदुर्गातच आहेत तसेच ते कुठे आहेत हे मी तुम्हाला का सांगू अशी वक्तव्य केल्याचे काही वृत्तवाहिन्या व स्थानिक चॅनेल वरूनही प्रसिद्ध झाले होते. यावरून नितेश राणे कुठे आहेत हे केंद्रीयमंत्री राणेंना माहिती असण्याची शक्यता गृहीत धरून कणकवली पोलिसांकडून नारायण राणे यांना चौकशीला हजर राहण्याबाबत ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Related Stories

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात हवामान विभागानं दिला अतिवृष्टीचा इशारा

Abhijeet Shinde

दापोलीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाल्याने प्रशासनाची धावपळ

Abhijeet Shinde

संगमेश्वर, लांजा, चिपळूण तालुक्यात भूकंपाचा धक्का

Patil_p

टॅक्टरच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी

Patil_p

रत्नागिरीत कोरोनाचे आणखीन दोन बळी

Abhijeet Shinde

खेड पोलिसांच्या सतर्कतेने चोरीस गेलेला मोबाईल मिळाला परत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!