तरुण भारत

विवोचे 2 स्मार्टफोन्स बाजारात दाखल

नवी दिल्ली : चिनी स्मार्टफोन कंपनी विवोने 2 नवे स्मार्टफोन नुकतेच सादर केले आहेत. जे विविध वैशिष्टय़ांनी भरलेले आहेत. विवो व्ही 23 व विवो व्ही 23 प्रो हे 2 स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. 29 हजाराच्या पुढे या फोनच्या किमती असणार आहेत. कर्व्हड अमोलेड डिस्प्लेसह फोन 2 रंगात उपलब्ध करण्यात आले आहेत. सदरच्या नव्या स्मार्टफोन्सची विक्री 19 जानेवारीपासून फ्लिपकार्ट आणि विवो डॉट कॉमवर सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे ऑफ लाइन रिटेलरकरांकडे सदरचे फोन विक्रीसाठी उपलब्ध असतील.

विवो व्ही 23 प्रो

Advertisements
 • स्टोरेज – 8 जीबी व 128 जीबी
 • रंग- सनशाइन गोल्ड व स्टारडस्ट ब्लॅक
 • चार्जिंग- 44 वॅट फास्ट चार्जिंग सुविधा
 • बॅटरी- 4 हजार 300 एमएएच
 • कॅमेरा- 50 एमपी मुख्य प्रंट कॅमेरा
 • प्रेसेसर- मीडियाटेक डायमेंशन 1200 एसओसी
 • स्क्रीन- 6.56 इंच फूल एचडी प्लस डिस्प्ले

विवो व्ही 23

 • स्क्रीन- 6.44 इंच फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले
 • कॅमेरा- 50 एमपी अधिक 8 एमपीचा डय़ूअल कॅमेरा
 • चार्जिंग- 44 वॅटच्या फास्ट चार्जिंगची सुविधा
 • प्रोसेसर- मीडियाटेक डायमेंशन 920 एसओसी
 • बॅटरी- 4 हजार 200 एमएएच

Related Stories

मायक्रोसॉफ्टचे तेलंगणात मोठे डाटा केंद्र

Amit Kulkarni

स्मार्टफोन व्यवसायामधून माघार नाही-एलजीचे स्पष्टीकरण

Patil_p

देशातील पहिला 5 जी स्मार्टफोन 24 फेब्रुवारीला होणार सादर

tarunbharat

मोटो जी 9 पॉवर आज होणार दाखल

Patil_p

‘इन’ आवृत्तीच्या दोन स्मार्टफोनचे सादरीकरण

Patil_p

भारतात नोकियाचे लॅपटॉप, स्मार्टटीव्ही दाखल

Patil_p
error: Content is protected !!