तरुण भारत

योगी सरकारला मोठा झटका; कॅबिनेट मंत्र्याने दिला राजीनामा

ऑनलाईन टीम / तरुण भारत

पाच राज्यांच्या विधानसभांचे बिगुल वाजले असून याबाबतचे संपूर्ण नियोजन ८ जानेवारी २०२२ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार पाच राज्यांच्या निवडणूका ह्या सात टप्प्यात होणार असल्याचं ही यावेळी आयोगाने स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर पहिल्या टप्यात उत्तरप्रदेशच्या निवडणूका होणार असल्याने उत्तर प्रदेशच्या राजकिय घडामोडींना वेग आला असून, योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला मोठा झटका बसला असून कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिला असून ते आता राज्यपालाची भेट घेणार आहे. सद्या मंत्री मौर्य यांच्याकडे चार विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. तर मौर्य हे श्रम आणि सेवायोजन व समन्वय मंत्री होते.

राजीनामा देताना म्हटले आहे कि, उत्तर प्रदेश सरकारने सत्ताधारी दलित, मागासवर्गीय, शेतकरी, बेरोजगार, तरुण आणि लहान-लहान-मध्यम व्यापाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याच्या वृत्तीमुळे मी आपला राजीनामा देत आहे. असे कारण सांगत मौर्य यांनी कॅबिनेट मंत्री पदावरुन राजीनामा दिला आहे. सोबतच मौर्य लवकरच भाजपला देखील रामराम ठोकणार अशा चर्चांना देखील उधाण आले आहे. ते लवकरच समाजवादी पार्टीत पक्षप्रवेश करू शकतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Advertisements

Related Stories

पुणे : भारत बंदमध्ये शेतकरी संघटना सहभागी नाही : अनिल घनवट

datta jadhav

गुजरात किनारपट्टीजवळ पाकिस्तानी मच्छिमाराला अटक

datta jadhav

दिल्ली : 1 सप्टेंबरपासून सुरू होणार 9 वी ते 11 वी पर्यंतच्या शाळा ?

Rohan_P

कराडला यशवंत मल्टीस्पेशलिटी संचलित कोव्हिड सेंटर सुरू

Patil_p

सोलापूर ग्रामीणमध्ये 3 कोरोनाबाधितांची भर

Abhijeet Shinde

दूध दरवाढ प्रश्नी जतमध्ये विठ्ठल प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत सरकारचा केला निषेध

Abhijeet Shinde
error: Content is protected !!