तरुण भारत

कारवाईच्या भितीने एसटी चालकाची आत्महत्या

प्रतिनिधी / गारगोटी

एस टी च्या संपामुळे गेली दोन महिने आर्थिक विवंचणेत असलेला धनाजी मल्हारी वायदंडे वय ३८ रा. नाधवडे ता. भुदरगड या चालकांने काल दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेने एसटी कर्मचारी वर्गात असंतोष उफाळला आहे .कालच त्याला नोटीस मिळाली, त्यामुळे धनाजी सकाळपासुन मानसिक तणावाखाली होता.याबाबत भुदरगड पोलीसांकडे रात्री उशिरापर्यंत नोंद नव्हती.

Advertisements

घटनास्थळावरून मिळालेलीमाहिती अशी की, एस टी संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांवर गारगोटी आगार मधुन शासनाच्या आदेशाने निलंबनाची कारवाईची कारणे दाखवा नोटीस मागील आठवड्यापासुन देण्यात येत आहेत. दि. ५ रोजी धनाजीला नोटीस देण्यात आली होती . कालच त्याला सकाळी नोटीस मिळाली, त्यामुळे धनाजी सकाळपासुन मानसिक तणावाखाली होता . धनाजी हा गेली बारा वर्ष एस टी मध्ये चालक म्हणुन काम करत होता . मागील सहा वर्षापूर्वी गारगोटी आगारात चालक म्हणुन रुजू झाला होता .काल ( दि .११ ) दुपारी ३ वाजता मिळालेल्या नोटीस मुळे मानसिक स्थिती बिघडल्याने राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

धनाजी यास एस टी मधुन मिळणाऱ्या पगाराशिवाय त्याला दुसरे कोणतेही कौटुंबिक उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने एस टी महामंडाळामधुन मिळणारे वेतन हेच कुंटुंबाचे आर्थिक आधार होता. गेली दोन ते अडीच महिने एसटी शासन विलीकरणासाठी कामागारांनी पुकारलेल्या संपामुळे कुंटुंबाचा उद्‌रनिर्वाह, मुलाचा शैक्षणिक खर्च यामुळे गेली दोन माहने आर्थिक घडी विस्कटली असल्याने, त्यातच एस टी आगाराकडून मिळालेली कारणे दाखवा नोटीस यामुळे धनाजीची मानसिक स्थिती बिघडली होती. त्यातच त्याने आत्महत्याचा टोकाचा पाऊल उचलला.

उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय गारगोटी येथे नेण्यात आले. मनमिळावू धनाजीच्या आत्महत्येची बातमी समजताच एस टी कर्मचाऱ्यांनी गारगोटी येथे जमा होत. धनाजी अमर रहे च्या घोषणा देत, यावेळी शासनाचा निषेध नोंदवला. धनाजीच्या परस्थिितीने घडलेल्या घटनेने नाधवडे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . त्याच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी, मुलगा असा परिवार आहे. मनमिळावु धनाजीच्या आत्महत्येने गारगोटी आगारातील कर्मचाऱ्यानी धनाजी अमर रहे च्या घोषणा देत, यावेळी शासनाचा निषेध नोंदवला.अजुन किती कामगारांचे संसार उघड्यावर पडणार आहे हे निर्दयी सरकार,अशा संपप्त भावना यावेळी कामगारांनी व्यक्त केल्या.

Related Stories

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

ब्रिटनमधील लॉक डाऊन 1 जून पर्यंत वाढवला

Rohan_P

‘म्युकरमायकोसिस’ला स्वस्त सॅनिटायझरही असू शकते जबाबदार

datta jadhav

“कर्नाटकात जुनमध्येही होणार नियमांची कडक अंमलबजावणी”

Abhijeet Shinde

कराड येथे दोन संशयित रुग्णांचे कोरोना रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आढावा बैठकांना वेग

Patil_p
error: Content is protected !!