तरुण भारत

‘जनशताब्दी’च्या बिघाडामुळे ‘कोरे’चे वेळापत्रक विस्कळीत

प्रतिनिधी/ चिपळूण

   मुंबई ते मडगांव धावणाऱया जनशताब्दी एक्प्रेस गाडीच्या इंजिनमध्ये बुधवारी सकाळी कामथे दरम्यान बिघाड झाल्याने कोकण रेल्वे मार्गावरील गाडय़ांचे वेळापत्रक काही काळ विस्कळीत झाले.

Advertisements

  मुंबईहून निघालेली जनशताब्दी एक्स्प्रेस ही गाडी कामथे रेल्वे स्थानकादरम्यान आलेली असताना तिच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे ही गाडी येथेच थांबवून ठेवण्यात आली. दुरूस्ती पूर्ण झाल्यानंतर दोन तासांनी ही गाडी मार्गस्थ झाली.  जनशताब्दी पाठोपाठ धावत असलेली तेजस एक्स्प्रेस ही गाडी चिपळूण स्थानकातच थांबवून ठेवण्यात आली होती. जनशताब्दीच्या एक्प्रेस गाडीच्या इंजिन बिघाडामुळे कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला.

Related Stories

गणेशोत्सव साजरा करण्यावरुन दोन गटात मारहाण

Patil_p

अखेर मंडणगड पोलिसात गुन्हा दाखल

Patil_p

‘मेरुळा’ नहीं खाया, तो क्या खाया?

NIKHIL_N

धारगळच्या रेडकर हॉस्पिटलमध्ये होणार कोरोना लसीचे संशोधन

NIKHIL_N

मेरी जान तिरंगा है..!

NIKHIL_N

कोरोना चाचणी न करताच ४२ जणांना मेसेज; चिपळुणातील गंभीर प्रकार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!