तरुण भारत

राजद्रोहाच्या गुन्हय़ातून दोघांना जामीन

अनगोळ येथील संगोळ्ळी रायण्णा पुतळा विटंबन प्रकरण : एकाला अटकपूर्व जामीन

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

अनगोळ येथील कनकदास कॉलनी, आंबेडकरनगर येथे असलेल्या संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळय़ाची विटंबना करण्यात आली होती. या प्रकरणातील संशयितांवर टिळकवाडी पोलिसांनी राजद्रोहासारखा गुन्हा दाखल केला होता. यातील दोघांना जामीन मंजूर केला असून एकाला अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

सूरज भरमा कंग्राळकर (वय 20, रा. कनकदास कॉलनी, अनगोळ) आणि जोतिबा मनोहर भांदुर्गे (वय 31, रा. कोनवाळ, आंबेडकरनगर, अनगोळ) याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. दि. 18 डिसेंबर 2021 रोजी रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास अनगोळ येथील संगोळ्ळी रायण्णा पुतळय़ाची विटंबना केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

फिर्यादी शिवराज इरय्या होळीमठ (वय 27, रा. कनकदास कॉलनी, आंबेडकरनगर) हे रात्री झोपले असताना काही तरी आवाज येत आहे म्हणून घराबाहेर पडले. यावेळी वरील दोघांसह चौघेजण संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळय़ाची विटंबना करत असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी आरडाओरड केला. यामुळे महांतेश कुरबर, अरुण पाटील, सिद्धाप्पा होलमनी, नागेश मलतवाडी, विनायक होळकर, मल्लिकार्जुन वग्गण्णावर हे देखील धावत आले.

या सर्वांना पाहून हे सर्वजण पळून गेल्याची फिर्याद शिवराज यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात दिली. टिळकवाडी पोलिसांनी वरील दोघांसह चौघांवर 124(अ), 153(अ), 295, 327 सहकलम 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. महत्त्वाचे म्हणजे 24 डिसेंबर 2021 रोजी राजद्रोहाचा गुन्हा पोलिसांनी दाखल करून सूरज याला अटक केली होती. त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली.

दुसरा संशयित जोतिबा भांदुर्गे हा फरार होता. त्याने अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. त्यालाही आठवे जिल्हासत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दोघे संशयितही अनगोळ येथील काटाग्राऊंड खून प्रकरणामध्ये असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले होते. याचबरोबर त्यांच्यावर आणखी एक हाणामारी प्रकरणदेखील दाखल झाल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर आपला युक्तिवाद केला होता. मात्र आठवे जिल्हासत्र न्यायालयाने सूरज कंग्राळकर याला 1 लाख रुपयांचे दोन जामीनदार आणि तितक्मयाच रकमेचे हमीपत्र तर जोतिबा याला 1 लाखाचा एक जामीनदार आणि तितक्मयाच रकमेचे हमीपत्र, पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू नये, पोलिसांना सहकार्य करणे या अटींवर दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. या खटल्यात दोघांच्यावतीने ऍड. प्रताप यादव यांनी काम पाहिले.

Related Stories

किणये ग्रा. पं. मध्ये नवीन चेहऱयांना संधी

Patil_p

विकेंड कर्फ्यूमध्येही चोरटय़ांनी दाखविली करामत

Amit Kulkarni

कांदा दरात वाढ; बटाटा दर स्थिर

Patil_p

परतीच्या पावसाचे थैमान

Omkar B

इंडी तालुक्मयातील अधिकाऱयांना शंकरगौडा पाटील यांचे मार्गदर्शन

Patil_p

बेळगावात बंद शांततेत; संमिश्र प्रतिसाद

Patil_p
error: Content is protected !!