तरुण भारत

सोमवारपासून पुन्हा शाळा सुरू

जिल्हाधिकाऱयांचा आदेश : कित्तूर शाळा बंद

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

काही शाळकरी मुलांना कोरोनाची लागण झाल्यामुळे बेळगाव शहर व जिल्हय़ात पहिली ते नववीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिला होता. आता सोमवार दि. 17 जानेवारीपासून पुन्हा शाळा सुरू करण्याचा आदेश दिला आहे.

मंगळवार दि. 11 ते 18 जानेवारीपर्यंत पहिली ते नववीपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली होती. या आदेशात बुधवारी बदल करण्यात आला असून सोमवार दि. 17 जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे.

कित्तूर येथील राणी चन्नम्मा सैनिक शाळेतील 82 विद्यार्थिनी व 10 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आदेशापर्यंत सैनिक शाळा बंद ठेवण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी दिली असून या व्यतिरिक्त जिल्हय़ातील इतर सर्व निवासी शाळाही सोमवारपासून सुरू होणार आहेत.

बुधवारी राज्याच्या मुख्य सचिवांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱयांनी पूर्वी दिलेल्या आदेशात बदल केला आहे. कित्तूर येथील सैनिक शाळा वगळता पहिली ते नववीपर्यंतचे वर्ग सोमवारपासून भरविण्याची सूचना त्यांनी केली आहे.

Related Stories

शिवरायांचा अवमान करणाऱयांवर कारवाई करा

Patil_p

भाजी खरेदीसाठी गेले अन् क्वारंटाईन झाले

Patil_p

लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढविली

Rohan_P

कर्नाटक : दुर्मिळ असलेली 380 भारतीय स्टार कासवांची तस्करी; एकास अटक

Sumit Tambekar

जुन्या धारवाड रोडवरील उड्डाणपूल समस्यांच्या गर्तेत

Patil_p

प्रिंटींग व्यावसायिकांना विशेष पॅकेज द्या

Patil_p
error: Content is protected !!