तरुण भारत

लोकमान्य शाखा वेंगुर्ले तर्फे वेंगुर्लेतील पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार.

वेंगुर्ले / प्रतिनिधी:


लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी शाखा वेंगुर्ले तर्फे वेंगुर्ले तालुक्यातील पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार शाखाधिकारी पुरुषोत्तम राऊळ यांच्या हस्ते करण्यात आला. लोकमान्य सोसायटी शाखा वेंगुर्लेच्या सभागृहात गुरुवारी झालेल्या या सत्कार समारंभ प्रसंगी वेंगुर्ले तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रदीप सावंत, लोकमान्य सोसायटीचे चक्रपाणी गवंडी,  स्नेहल गांवकर, प्रिया करंगुटकर, प्रकाश मालवणकर उपस्थित होते. यावेळी कुडाळ तालुका पत्रकार समितीचा “व्याध”कार ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती उत्कृष्ठ जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त दै. तरुण भारतचे वेंगुर्ले प्रतिनिधी के. जी. गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा जेष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त दै. तरुण भारतचे तुळसचे पत्रकार महादेव उर्फ आपा परब, वेंगुर्ले तालुका पत्रकार समितीचा कै. प्रभाकर अनंत तथा शशिकांत केसरकर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त दै. तरुण भारतचे पत्रकार भरत सातोस्कर, कै. अरुण काणेकर स्मृती जेष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त पत्रकार मॅक्सी कार्डोज, जागृती मंडळाचे अध्यक्ष कै. संजय मालवणकर स्मृती उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त पत्रकार विनायक वारंग, नागपूर येथील संस्थेचा बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त पत्रकार दिपेश परब व कै. सुमती गंगाराम सावंत स्मृती उत्कृष्ठ महिला जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त साप्ताहिक किरातच्या संपादिका सिमा मराठे यांचा  लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप. सेवा सोसायटी शाखा वेंगुर्लेचे शाखाधिकारी पुरुषोत्तम राऊळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Advertisements


लोकमान्य मल्टीपर्पज को ऑप. सेवा सोसायटी शाखा वेंगुर्लेने सामाजिक बांधिलकी जपत उद्योजक, सेवानिवृत्त कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी सत्कार, वाढदिवस असे विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांचे हे कार्य स्तृस्त्य असून त्यांनी यापुढेही असेच उपक्रम राबवून आपल्या शाखेच्या नावाप्रमाणेच लोकमान्य व्हावे अशा शुभेच्छा सत्कारास उत्तर देताना के. जी. गावडे, सिमा मराठे यांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखाधिकारी पुरुषोत्तम राऊळ यांनी तर सुत्रसंचालन व आभार स्नेहल गांवकर यांनी मानले.

Related Stories

भरपाईपासून कुणीही वंचित राहणार नाही!

NIKHIL_N

मुंबईस्थित ओटवणे ग्रामस्थ मंडळाचा गावातील पूरग्रस्तांना मदतीचा हात

NIKHIL_N

मावळंगेतील 2 व्यक्तींचे मृत्यूचे कारण व्हिसेरा रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होणार

Patil_p

कोकण रेल्वेसाठी प्राण गमावलेल्यांना वाहिली आदरांजली

Patil_p

पत्नीच्या खूनप्रकरणी जामीन पुन्हा फेटाळला

NIKHIL_N

एसटी आजपासून गावागावात धावणार

NIKHIL_N
error: Content is protected !!