तरुण भारत

“आम्ही काँग्रेसकडे झोळी घेऊन उभे नाही”

ऑनलाईन टीम/तरुण भारत

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. शिवसेनाही काही राज्यांमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. गोव्यामध्ये काँग्रेस सोबत युती करण्याची शिवसेनेची इच्छा होती. संजय राऊत युतीसाठी सकारात्मक होते. शिवसेनेने १० जागांची मागणीही केली होती. या १० जागा शिवसेना आणि मित्रपक्षांना सोडाव्यात असा आग्रह होता. पण काँग्रेसने आपली उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेस युती करण्याच्या तयारीत सल्याचे यावरून दिसून येत आहे. काँग्रेसने यादी जाहीर केल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, गोव्यात काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही काँग्रेसकडे झोळी घेऊन उभे नाही आहोत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने गोव्यात एकत्र लढण्याचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवला होता. राहुल गांधी यासाठी सकारात्मक आहेत पण गोव्याच्या स्थानिक नेतृत्वाच्या डोक्यात नक्की काय आहे हे मला माहिती नाही. ४० पैकी ३० जागा काँग्रेसलेल्या लढण्यास आम्ही सांगितले आहे. उरलेल्या १० जागांवर मित्र पक्षांना लढण्याची संधी द्या. काँग्रेस गेल्या ५० वर्षात ज्या जिंकू शकली नाही त्या जागा आम्ही मागितल्या आहेत. काँग्रेसच्या खिशातल्या जागा आम्ही मागितलेल्या नाहीत. गोव्यात एकत्र लढलो नाही तर काँग्रेसचे एक आकडी आमदार सुद्धा निवडणून येणार नाहीत. असे वातावरण असताना आमच्या सारखे काही पक्ष काँग्रेसला आधार देण्याचा प्रयत्न करत होते,” असे संजय राऊत म्हणाले.

Advertisements

Related Stories

नवीन कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ हरियाणातील शेतकरी संघटनांचे कृषिमंत्र्यांना पत्र

datta jadhav

गोव्यात 18 ते 45 वयोगटासाठी अजूनही व्हॅक्सीनचा अभाव…!

Amit Kulkarni

‘लक्ष्मीबाई’च्या किल्ल्यातून वायुदलासाठी हेलिकॉप्टर्स

Patil_p

युपी प्लस योगी,बहुत है उपयोगी

Patil_p

दिल्लीत उद्यापासून कोरोना व्हॅक्सीनचे परिक्षण; पाहिल्या टप्प्यात 100 लोकांवर घेणार चाचणी

Rohan_P

ब्राझीलमधून येणाऱ्या प्रवाशांवर अमेरिकेने घातली बंदी

datta jadhav
error: Content is protected !!