तरुण भारत

उत्तरप्रदेशसाठी काँग्रेसचे 125 उमेदवार घोषित

महिलांना 40 टक्के स्थान : उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला तिकीट : पत्रकारांचा समावेश

वृत्तसंस्था /लखनौ

Advertisements

उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या 125 उमेदवारांच्या यादीत 50 महिलांनाही स्थान मिळाले आहे.  मागील काही काळात चर्चेत राहिलेल्या महिलांना प्रियंका वड्रा यांनी उमेदवारी दिली आहे. यात सर्वात चर्चेत राहिलेले नाव उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या आईचे आहे. प्रियंका वड्रा यांनी आशा सिंह यांना स्वतःची लढाई लढता यावी म्हणून उमेदवारी दिल्याचे सांगितले आहे.

125 उमेदवारांच्या यादीत 50 महिलांचा समावेश आहे. या महिलांमध्ये काही पत्रकारांचा समावेश आहे. तर काही संघर्ष करणाऱया महिला आहेत, तर काहीजणी  सामाजिक कार्यकर्त्या आहेत. अत्यंत अत्याचार झेललेल्या महिलांनाही आम्ही उमेदवारी दिली आहे. पहिल्या यादीत 40 टक्के महिला आणि 40 टक्के तरुणाईला स्थान देण्यात आल्याचे प्रियंका वड्रा म्हणाल्या.

निवडणुकीनंतर देखील उत्तरप्रदेशात राहणार

प्रियंका वड्रा यांच्यावर विरोधकांडून निवडणूक पर्यटनावर उत्तरप्रदेशात येत असल्याचा आरोप केला जात असतो. यावर त्यांनी भूमिका मांडली आहे. मी जे प्रयत्न सुरू केले आहेत, ते कायम ठेवणार आहे. निवडणुकीनंतर देखील उत्तरप्रदेशात राहणार आहे. आमच्या पक्षाने अन्यत्र भूमिका बजवावी असे सांगितल्यास ते देखील करणार आहे. पक्षाला मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अत्याचार झेललेल्यांचा ठरू आवाज

आम्ही अत्याचार झेललेल्या लोकांचा आवाज होऊ. आमच्या उन्नावच्या उमेदवार बलात्कार पीडितेच्या आई आहेत. सत्तेच्या माध्यमातून त्यांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला, त्यांच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यात आले, सत्तेद्वारे त्यांनी न्याय मिळावा यासाठी त्यांना संधी दिल्याचे प्रियंका म्हणाल्या.

पंखुडी पाठक, अर्चना गौतमचा  उमेदवारांमध्ये समावेश

नोएडा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून पंखुडी पाठक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्ली विद्यापीठापासून विद्यार्थी राजकारणात सक्रीय पंखुडी या कधीकाळी सप अध्यक्ष अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यांच्या निकटवर्तीय होत्या. परंतु समाजवादी पक्षात बिनसल्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर अभिनेत्री अर्चना गौतमला मेरठच्या हस्तिनापूर मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी प्राप्त झाली आहे. अर्चनाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.

पूनम पांडे यांना संधी

सोनभद्र नरसंहाराच्या पीडितांपैकी एक रामराज गोंड यांनाही उमेदवारी दिली आहे. कोरोन काळात प्रचंड काम केलेल्या आशा कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला. त्यांच्यापैकी पूनम पांडे यांना आम्ही संधी दिली आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱया या महिला संघर्ष करणाऱया आणि धाडसी आहेत. काँग्रेस पक्ष त्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे उद्गार प्रियंका यांनी काढले आहेत.

सदफ जाफर यांना उमेदवारी

सीएए-एनआरसीच्या विरोधात निदर्शनात सामील राहिलेल्या सदफ जाफर यांनाही पक्षाने उमेदवारांच्या पहिल्या यादीत सामील केले आहे. सदफ यांनी सीएएविरोधात मोठा संघर्ष केला होता. सरकारने त्यांची छायाचित्रे पोस्टरवर झळकवून त्यांचा छळ केला. तुमच्यासाब्sात अत्याचार झाला असल्यास तुम्ही स्वतःच्या अधिकारांसाठी लढा असा माझा संदेश असल्याचे प्रियंका म्हणाल्या.

आयाराम-गयारामांना घाबरणार नाही

आयाराम, गयाराम प्रत्येक निवडणुकीत, प्रत्येक पक्षात दिसून येतात. अशा गोष्टींना कुठल्याच पक्षाने घाबरू नये. आमचे सहकारी अन्यत्र गेल्यास ते आमच्या संघर्षातून मागे हटत असल्याचे आम्हाला वाटते. राजकारणाचा मूळ उद्देश सेवा आहे हा संदेश आम्ही देऊ इच्छितो असे प्रियंका यांनी सांगितले आहे.

Related Stories

घुसखोरीमुक्त राज्यावर भाजपचा भर

Patil_p

महाराष्ट्रातील रुग्णवाढ चिंताजनक

Patil_p

ऑक्सिजनचं संकट दूर करा, लोक मरत आहेत; दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

Abhijeet Shinde

धोका वाढला : जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 35 हजार पार

Rohan_P

‘या’ राज्याने मिळवला सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान!

Abhijeet Shinde

21 सप्टेंबरपासून आणखी 40 एक्स्प्रेस

Patil_p
error: Content is protected !!