तरुण भारत

पूर्ण शरीरावर काढून घेतले टॅटू

स्वतःची छायाचित्रे विकून कमातवेय लाखो रुपये

एका मॉडेलने स्वतःची छायाचित्रे ऑनलाईन विकून दीड कोटींहून अधिक कमाई केली आहे. या मॉडेलचे नाव अंबर ल्यूक आह. अंबरच्या पूर्ण शरीरावर टॅटूच टॅटू आहेत. म्हणजेच्या शरीराच्या 99 टक्के त्वचेवर तिने टॅटू काढून घेतले आहेत.

Advertisements

26 वर्षीय अंबर ल्यूकची ओळख आता टॅटू मॉडेल म्हणून झाली आहे. ती ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडची रहिवासी आहे. या मॉडेलने स्वतःच्या शरीरात आणखीन काही बदल करवून घेतले आहेत. कानाच्या खालील हिस्स्याला तिने लांब करविले आहे. तर स्वतःच्या त्वचेत अनेक ठिकाणी पियर्सिंग करविले आहे. या मॉडेलची 99 टक्के त्वचा टॅटूच्या इंकने भरलेली आहे. या टॅटू प्रेमामुळे काही काळासाठी ती आंधळी झाली होती. जेव्हा तिने स्वतःच्या आयबॉलला निळय़ा रंगाने रंगविले होते.

आज मी जी काही आहे, त्याबद्दल मला पश्चाताप नाही. मी आज जशी दिसते, ते मला अत्यंत पसंत आहे. हा सर्व बदल मला मोठा आत्मविश्वास मिळून देत असल्याचे ती सांगते.

शरीरावर इतके टॅटू असल्याने कधी जॉब मिळणार नसल्याची भीती प्रारंभी वाटत होती. परंतु असे घडले नसल्याचे तिने म्हटले आहे. अंबर ल्यूकला सोशल मीडियावर अनेक ब्रँड्ससोबत काम करण्याची संधी देखील मिळत राहते. तिला अनेक महागडय़ा फोटोशूटच्या ऑफर्स देखील मिळाल्या आहेत. स्वतःची छायाचित्रे विकून सुमारे 1 कोटी 63 लाख रुपये कमाविले असल्याचा तिचा दावा आहे. 2023 मध्ये स्वतःचे घर खरेदी करण्याचे तिचे स्वप्न आहे.

वयाच्या 14 व्या वर्षी पहिला टॅटू

अंबर ल्यूकने वयाच्या 14 व्या वर्षी स्वतःचा पहिला टॅटू करविला होत. तेव्हा ती नैराश्याला तोंड देत होती. टॅटू काढून घेतल्यावर स्वतःला अधिक आत्मविश्वासपूर्ण मानत असल्याचे तिचे म्हणणे आहे.

Related Stories

सायनावरील बायोपिक 26 मार्चला झळकणार

Patil_p

फक्त एक थपडेमुळे…

tarunbharat

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या सेटवर वृक्षारोपण

Rohan_P

ब्लॅकआउट’मध्ये दिसणार विक्रांत अन् नोरा

Patil_p

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे थिएटर्स, मल्टिप्लेक्सवर ‘या’ तारखेपर्यंत राहणार निर्बंध

Abhijeet Shinde

सलमान खानच्या हत्येचा कट उधळला; शार्प शूटर राहुलला उत्तराखंडातून अटक

Rohan_P
error: Content is protected !!