तरुण भारत

आता येतेय उडणारी नौका

प्रतीक्षा संपुष्टात : पाण्यासह आकाशातही करा सैर

पाण्यासह आकाशात आलिशान सैर करण्याची इच्छा बाळगणाऱयांसाठी चांगली बातमी आहे. इटलीची एक कंपनी जगभरात समुद्रात तरंगण्यासह आकाशात उडू शकणारे याट निर्माण करणार आहे. हे याट सुमारे 490 फूट लांबीचे असेल आणि याला ‘एअर याट’ म्हटले जातेय. या याटची निर्मिती कार्बर फायबरने केली जात असून जे 60 नॉट किंवा 112 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने उडू शकते.

Advertisements

उड्डाणात मदतीकरता या याटमध्ये 4 सौरऊर्जेने संचालित इलेक्ट्रिक प्रोपलर बसविण्यात आले आहेत. यात हेलियमने भरलेले फुगे देखील जोडण्यात आले आहेत. यामुळे हे उडू शकते आणि पाण्यावर तरंगू देखील शकते. एअर याटमधील फुगे हेलियमने भरलेले असल्याने ते आकाशात उडू शकते. या एअर याटसाठी किती खर्च करावा लागेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

8 इंजिन्सचा समावेश

कोटय़वधी रुपये खर्च करू शकणाऱया वैयक्तिक मालकांना डोळय़ासमोर ठेवून याटचे डिझाइन तयार केले आहे. या पूर्ण कार्बन फायबर आराखडय़ाचा आकार सुमारे 300 फूटांचा असेल, याची रुंदी 260 फूट असणार आहे. या याटमध्ये दोन विशाल फुग्यांसह 8 इंजिन्स बसविण्यात येणार आहेत. हे सर्व इंजिन्स हलकी बॅटरी आणि पॅनेल्सने संचालित होतील. ही नौका 60 नॉट किंवा 112 किलोमीटर प्रतितास या वेगाने उड्डाण करू शकणार असल्याचे लज्जरिनी या कंपनीने म्हटले आहे.

खर्चिकांना परवडणारी नौका

हे याट सलग 48 तासांपर्यंत उड्डाण करू शकते. एअरयाट हे सर्वसामान्य तसेच पर्यटकांना नेणरो विमान नाही. याचे डिझाइन वैयक्तिक मालकांना डोळय़ासमोर ठेवून करण्यात आली आहे. या याटमध्ये खासगी सूट असतील, जेथे बेड आणि बाथरुमची सुविधा असणार आहे. यामुळे प्रवासी दीर्घ प्रवासादरम्यान अनेक दिवसांपर्यंत वेळ घालवू शकतील. या याटमध्ये राहून प्रवासी पाण्यात राहताना लाटांचा अनुभव घेऊ शकेल आणि 5 हजार फुटांच्या उंचीवर मोकळय़ा हवेत श्वासही घेऊ शकेल असे कंपनीकडून सांगण्यात आले.

Related Stories

अमेरिकेत : तिसरी लाट

Patil_p

चीनमध्ये सातव्या जनगणनेचे काम सुरू

Patil_p

पहिल्यांदाच रात्रसंचारबंदी

Patil_p

भारत आणि ब्रिटनच्या सोलर ग्रीन ग्रिड्स पुढाकाराला अमेरिकेचा पाठींबा

Abhijeet Shinde

जॉर्ज फ्लॉयडच्या प्रकरणात तडजोड

Patil_p

ब्रिटनमध्ये खलिस्तानी टीव्हीवर कारवाई

Patil_p
error: Content is protected !!