तरुण भारत

स्वीत्झर्लंडमध्ये नवा पुढाकार

वृद्धांना डोळय़ासमोर ठेवत टाइम बँक योजना सुरू

67 वर्षीय क्रिस्टिना या शाळेतून निवृत्त झाल्यावर एकटय़ाच जगत होत्या. जीवन व्यतित करण्यासठी सरकारकडून त्यांना पुरेसे निवृत्तीवेतन मिळते. तरीही एका 87 वर्षीय आजारी वृद्धाची देखभाल करण्याचे काम त्या करतात. हे काम मी पैशांसाठी नव्हे तर स्वतःचा वेळ बँकेत सुरक्षित ठेवण्यासाठी करत असल्याचे त्या सांगतात.

Advertisements

जेव्हा मी म्हातारी होईन, चालण्या-फिरण्यास असमर्थ ठरेन, तेव्हा या सुरक्षित केलेला वेळ मी परत मिळवू शकेन असे त्यांनी म्हटले आहे. प्रत्यक्षात स्वीत्झर्लंडने ‘टाइम बँक’ योजना सुरू केली आहे. याच्या अंतर्गत देशाचे नागरिक कुणाच्याही मदतीसाठी स्वतःचा वेळ देऊन त्याला ‘अर्जित भांडवला’च्या स्वरुपात टाइम बँकेत सुरक्षित ठेवू शकतात.

भविष्यात गरज पडल्यास ते याचा वापरही करू शकतील. स्वीत्झर्लंडच्या आरोग्य मंत्रालयाने ही योजना विशेषकरून एकटे राहणाऱया वृद्धांना नजरेसमोर ठेवून तयार केली आहे. याच्या अंतर्गत देशातील लोक स्वतःच्या इच्छेनुसरा गरजू वृद्धांची प्रकृती बिघडल्यास काळजी घेऊ शकतात. किंवा एकटेपणा दूर करण्यासाठी वृद्धांसोबत वेळ घालवू शकतात. वृद्धांना देण्यात आलेला हा वेळ या स्वयंसेवकांच्या सामाजिक सुरक्षा खात्यात ‘टाइम युनिट’च्या स्वरुपात जमा होतो. जेव्हा हे स्वयंसेवक वृद्धावस्थेत पोहोचतील आणि त्यांना कुठल्याही कामात मदतीची गरज भासेल तेव्हा टाइम बँक त्यांच्यासाठी स्वयंसेवकांची व्यवस्था करेल. जितका वेळ त्यांनी टाइम बँकेत जमा केला तितक्याच वेळेसाठी ते मदत मिळवू शकतील.

जगभरात वृद्धांची संख्या वाढत असल्याने ही संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरतेय. अमेरिका, ब्रिटन, जपान, न्यूझीलंड स्पेन आणि ग्रीस या देशांनीही ही व्यवस्था स्वीकारली आहे. सिंगापूर देखील लवकरच ही योजना लागू करण्याचा विचार करत आहे. या संकल्पनेवर सर्वप्रथम चर्चा अमेरिकेचे प्राध्यापक एडगर चान यांनी 1980 मध्ये सुरू केली होती.

कामाच्या वेळेचे ट्रकिंग

टाइम बँकेची संकल्पना देवाणघेवाणीच्या मॉडेलवर आधारित आहे. याच्या अंतर्गत आयटी सेवा, सल्ला देणे, मुलांची देखभाल, सलूनसंबंधी मदत, गार्डनिंग, घरात दुरुस्ती किंवा अन्य वेळ घेणारे काम सामील आहे. कामात लागणाऱया वेळेला टाइम बँकेकडून ट्रक केले जाते. हा वेळ टाइम युनिटच्या स्वरुपात जमा होतो. या योजनेत स्वीस तरुण-तरुणी मोठय़ा संख्येत सहभागी होत आहेत.

Related Stories

इस्रायल : रुग्ण वाढतेच

Patil_p

अमेरिकेत होऊ शकतात 1 लाखाहून अधिक मृत्यू!

prashant_c

उत्तर कोरियामध्ये ज्यो बायडेन करणार विशेष दूताची नियुक्ती

Patil_p

”सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदींनी केली प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी”

Abhijeet Shinde

डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला कोरोनाची लागण

datta jadhav

कमी उंचीच्या लोकांचा देश

Amit Kulkarni
error: Content is protected !!