तरुण भारत

अदानी समूह आता स्टील व्यवसायात उतरणार

पॉस्कोसोबत झाला करार : 37,000 कोटीची होणार गुंतवणूक

नवी दिल्ली : उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वात कार्यरत असणाऱया अदानी समूहाने पोलाद, नवीकरण ऊर्जा यासह अन्य क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या शोधात असणाऱया दक्षिण कोरियाची कंपनी पॉस्कोसोबत करार केला आहे. दोन्ही कंपन्यांनी या करारावर सहय़ा केल्या आहेत.

Advertisements

अदानी समूहाने दिलेल्या माहितीनुसार सदरच्या करारात पाच अब्ज डॉलरपर्यंतची गुंतवणूक होणार असल्याची माहिती आहे. ही गुंतवणूक टप्प्याटप्प्याने पुढील 10 ते 15 वर्षात होणार आहे. समूहाकडून गुजरातच्या मुंद्रामध्ये हरित, पर्यावरणीय स्थिती अनुकूल असणाऱया जागेवर स्टीलचा कारखाना उभारणीसह अन्य उद्योग व्यवसायांना सहकार्य करण्याची भूमिका बजावली जाणार आहे.

पॉस्कोसोबत हातमिळवणी

भारताचा दिग्गज उद्योग समूह अदानीने गुजरात येथील मुंदामध्ये स्टील कारखाना सुरु करण्यासाठी पॉस्कोसोबत करार केला आहे. याकरीता जवळपास 37,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

आम्हाला आनंद झालाय

अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी या व्यवहारावर म्हटले आहे, की आम्ही पॉस्कोसोबत हातमिळवणी केली असल्याचा रास्त अभिमान असून याघडीला तरी आम्ही खुप आनंदी असल्याचे म्हटले आहे. तसेच सदरची कंपनी ही जगातील सर्वात कुशल आणि स्टील निर्मितीमध्ये अत्याधुनिक कंपनी राहिली असल्याचे म्हटले आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्याचाही प्रयत्न केला जाणार असल्याचे अदानी यांनी स्पष्ट केले आहे.

अदानी समूहाचा विविध क्षेत्रात प्रवेश

अदानी समूह सध्या रिन्यूएबल एनर्जी, हायड्रोजन, लॉजिस्टिक्स, पोर्ट मॅनेजमेन्ट, एअरपोर्ट मॅनेजमेंट आणि रोड बांधणीशीं संबंधीत असणाऱया कामासोबत जोडला गेला आहे. यामुळे आता नवीन व्यवसाय स्टीलच्या क्षेत्रातही उत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज असल्याचे समूहाने म्हटले आहे.

Related Stories

विप्रो करणार नाही नोकर कपात

Patil_p

देशी ट्विटर म्हणून ओळख असणारे ‘कू’ ऍप आता स्थानिक भाषांमध्ये

Patil_p

मोबाईल ऍप आधारित पेमेंट 163 टक्क्मयांनी वाढले

Patil_p

‘फोर्ड’ने महिंद्रा ऍण्ड महिंद्रा सोबतचे सर्व प्रकल्प थांबविले!

Patil_p

शेअर बाजारात मजबूत तेजीची नोंद

Patil_p

विंडी लेकसाइड करणार अदानीत गुंतवणूक

Patil_p
error: Content is protected !!