तरुण भारत

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए8 लाँच

सदरचे मॉडेल भारतीय बाजारात दाखल

नवी दिल्ली : सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए 8 ला भारतामध्ये सादर करण्यात आले आहे. यामध्ये गॅलेक्सी टॅबलेटमध्ये 10.5 इंच WUXGA डिस्प्ले मिळत आहे. ज्याचा आस्पेक्टरेशियो 16.10 आहे. यामध्ये 4 जीबी पर्यंत रॅम मिळणार आहे.

Advertisements

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए 8 फक्त वायफाय आणि वायफायसह एलटीई मॉडेलमध्ये सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये 7,040एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार असून जी 15 डब्लू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. गॅलेक्सी टॅबलेटमध्ये डॉल्बी एटमॉसोबत क्वाड स्पीकरचा सेटअप मिळणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

गॅलेक्सी टॅबची किमत

भारतामध्ये सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए8ची 3जीबी रॅम व 32 जीबी स्टोरेजची किमत 17,999 रुपये आहे. ज्यामध्ये वायफायसह एलटीईची किमत 21,999 रुपये इतकी राहणार आहे.  सॅमसंग टॅबलेटला 17 जानेवारी रोजी ऍमेझॉनच्या ग्रेट रिपब्लिक डे सेल 2022 च्या दरम्यान खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

फिचर्स…

  • ­ गॅलेक्सी टॅब ए8 अँड्रॉईड 11 वर चालतो
  •  यामध्ये 10.5 इंच आकाराचा टीएफटी डिस्प्ले
  • ­ सर्व बाजूनी स्लिम बेजल्मसोबत उपलब्ध होणार आहे
  • ­ वायफाय, ब्लूटय़ूथ व्ही5, यूएसबी टाईप सी पोर्ट मिळणार

Related Stories

भारतात ‘पोको’चे सी31 मॉडेल लाँच

Amit Kulkarni

‘लावा’ 5-जी फोन सादर करण्याच्या तयारीत

Patil_p

विवो व्ही 20 एसई स्मार्टफोन बाजारात

Patil_p

ऍमेझॉनवर सॅमसंगचा सर्वात महाग स्मार्टफोन

tarunbharat

मोटोरोलाचा ‘मोटो इ-7 पॉवर’ सादर

Patil_p

रियलमीचा सी 11 स्मार्टफोन बाजारात

Patil_p
error: Content is protected !!