तरुण भारत

युकी भांब्रीचे आव्हान समाप्त

मेलबर्न  : 17 जानेवारीपासून येथे सुरू होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुरूष आणि महिलांच्या एकेरी प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविण्याचे भारतीय टेनिसपटूंचे स्वप्न संपुष्टात आले आहे.

पात्र फेरीच्या गुरूवारी येथे झालेल्या पुरूष एकेरीच्या दुसऱया फेरीतील सामन्यात झेकच्या मॅकहॅकने भारताच्या युकी भांब्रीचा 6-1, 6-3 असा पराभव केला. या पराभवामुळे भांब्रीचे पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळविण्याचे स्वप्न भंगले. त्याचप्रमाणे भारताच्या प्रज्नेश गुणेश्वरन, रामकुमार रामनाथन आणि अंकिता रैना यांचे आव्हानही यापूर्वीच संपुष्टात आल्याने आता ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत भारताचा एकही स्पर्धक एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये खेळताना दिसणार नाही.

Advertisements

Related Stories

विल्यम्सनला काही सामने हुकण्याची शक्यता

Amit Kulkarni

चेल्सी क्लब अंतिम फेरीत

Patil_p

‘सुप्रीमसी’वर शिक्कामोर्तब हेच मुंबई-चेन्नईचे लक्ष्य

Patil_p

मेलबर्न रिनेगेड्सचे नेतृत्व मॅडिसनकडे

Amit Kulkarni

राजस्थान-पंजाब आज चुरशीचा सामना

Patil_p

भारतीय हॉकी संघाची फ्रान्सविरुद्ध सलामी

Patil_p
error: Content is protected !!