तरुण भारत

हॉकी इंडियाकडून लिलिमा मिन्झचे अभिनंदन

नवी दिल्ली : भारतीय महिला संघातील अनुभवी हॉकीपटू लिलिमा मिंझ हिने हॉकी क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय नुकताच घेतला. दरम्यान भारतीय हॉकी क्षेत्रामध्ये दिलेल्या महत्त्वाच्या योगदानामुळे हॉकी इंडियाने लिलिमा मिंझचे खास अभिनंदन केले आहे.

भारतीय महिला हॉकी संघाने यापूर्वी दोनवेळा आशियाई क्रीडास्पर्धेत पदके मिळविली. या कामगिरीमध्ये लिलिमा मिंझचे योगदान निर्णायक ठरले होते. 2011 साली झालेल्या महिलांच्या चौरंगी हॉकी स्पर्धेत लिलिमा मिंझने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. मध्यफळीत खेळणाऱया लिलिमा मिंझने 156 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करताना 12 गोल नोंदविले. तसेच 2014 च्या आशियाई स्पर्धेत भारतीय महिला संघाला कांस्य तर 2018 च्या आशियाई स्पर्धेत रौप्य आणि 2019 साली झालेल्या हिरोशिमातील महिलांच्या सिरीज हॉकी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱया भारतीय संघामध्ये लिलिमाचा समावेश होता. 2016 च्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत लिलिमाने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.

Advertisements

Related Stories

भारतीय मुष्टियोद्धा ब्रिजेश यादव जखमी

Omkar B

आरसीबीच्या पदरी अपयशाचा ‘वनवास’!

Patil_p

कसोटी सामना पाच दिवसांचा रहावा : एमसीसी

Patil_p

पाक क्रिकेटपटू आझम खान रूग्णालयात दाखल

Patil_p

हार्दिक पांडय़ाच्या सरावाला प्रारंभ

Patil_p

पीएसजी क्लबकडे प्रेंच फुटबॉल चषक

Patil_p
error: Content is protected !!