तरुण भारत

बेंगळूर बुल्सकडून दबंग दिल्लीचा एकतर्फी धुव्वा

प्रो कबड्डी लीग : हरियाणा स्टीलर्स- यूपी योद्धा लढत बरोबरीत

वृत्तसंस्था /बेंगळूर

Advertisements

आठव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील बुधवारी खेळविण्यात आलेल्या 50 व्या सामन्यात बेंगळूर बुल्सने बलाढय़ दबंग दिल्लीचा 61-22 अशा गुणांनी दणदणीत पराभव केला तर दुसऱया एका सामन्यात हरियाणा स्टीलर्सने यूपी योद्धा संघाला 36-36 असे बरोबरीत रोखले.

बेंगळूर बुल्स आणि दबंग दिल्ली यांच्यातील सामन्यात बेंगळूर बुल्सतर्फे पवन सेहरावतने 27 चढायातून 27 गुण मिळविले. या सामन्यात दबंग दिल्लीला स्टार रायडर नवीनकुमारची उणीव भासली. प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या इतिहासात बेंगळूर बुल्सने  दबंग दिल्लीवर 39 गुणफरकाने मिळविलेला हा दुसऱया क्रमांकाचा मोठा विजय आहे. दबंग दिल्लीचा या स्पर्धेतील हा दुसरा पराभव आहे. या विजयामुळे बेंगळूर बुल्सने स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले. या सामन्यात पवन सेहरावत आणि सौरभ यांचा खेळ चमकदार झाला. मध्यंतरापर्यंत बेंगळूर बुल्सने दबंग दिल्लीवर 27-11 अशी आघाडी घेतली होती.

सामन्याच्या पूर्वार्धात बेंगळूर बुल्सने दोनवेळा दबंग दिल्लीचे सर्वगडी बाद केले. उत्तरार्धातील खेळाच्या सहाव्या मिनिटाला बेंगळूर बुल्सने दिल्ली दबंगचे तिसऱयांदा आणि 11 व्या मिनिटाला चौथ्यांदा सर्वगडी बाद करून 33 गुणांची आघाडी मिळविली. सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना बेंगळूर बुल्सने दबंग दिल्लीचे पाचव्यांदा सर्वगडी बाद करण्यात यश मिळविले. बेंगळूर बुल्सने हा सामना अखेर 39 गुणांच्या मोठय़ा फरकाने एकतर्फी जिंकला.

दुसऱया एका सामन्यात हरियाणा स्टीलर्सने सुरूवातीला पिछाडीवर राहून त्यानंतर मुसंडी मारत यूपी योद्धाला 36-36 असे बरोबरीत रोखले. या सामन्यात यूपी योद्धा संघाने हरियाणा स्टीलर्सचे सर्वगडी बाद करून पाच गुणांची आघाडी घेतली होती. हरियाणा संघातील विकास आणि मितु यांच्या शानदार कामगिरीमुळे यूपी योद्धाला आपली आघाडी अधिकवेळ राखता आली नाही. विकासने पाच गुण मिळवून देत यूपी येद्धाचे सर्वगडी बाद केले.

सामना संपण्यास 1 मिनिट बाकी असताना यूपी योद्धा संघ केवळ एका गुणाने आघाडीवर होता पण हरियाणाच्या विकासने शेवटच्याक्षणी आपल्या संघाला एक गुण मिळवून देत हा सामना 36-36 असा बरोबरीत सोडविला.

Related Stories

तीन देशात 100 क्लब गोल करणारा रोनाल्डो पहिला खेळाडू

Amit Kulkarni

टी-20 वर्ल्ड कप दर दोन वर्षांनी होणार

Patil_p

टॉम मुडी लंकेचे क्रिकेट संचालक?

Patil_p

टेनिस सुवर्ण जिंकणारी बेन्सिक पहिलीच स्वीस महिला

Patil_p

गावसकर बॉक्सचे उद्घाटन लवकरच

Patil_p

सलग 3 ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारी लॉरा पहिली ब्रिटिश महिला

Patil_p
error: Content is protected !!