तरुण भारत

फिलिपाईन्स भारताकडून खरेदी करणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

फिलिपाईन्स भारताकडून जगातील सर्वात वेगवान अशा ब्रह्मोस या सुपरसॉनिक जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्राची खरेदी करणार आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ही पहिली परकीय ऑर्डर आहे. हा करार 374.9 दशलक्ष डॉलर्सचा आहे. फिलिपाईन्सच्या संरक्षण विभागाने ही माहिती दिली आहे.

Advertisements

फिलिपाईन्सचा दक्षिण चीन समुद्रातील अधिकारक्षेत्रावरून चीनशी वाद आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्र फिलिपाईन्स आपल्या याच किनारपट्टीच्या भागात तैनात करणार आहे. त्यामुळे दक्षिण चीन समुद्रात आपली दादागिरी दाखवणाऱया चीनला या कराराचा मोठा धक्का बसला आहे. कारण ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र 4321 किमी प्रतितास वेगाने ध्वनीच्या वेगाच्या तिप्पट मारा करण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र फिलिपाईन्सचा किनारपट्टीचा भाग सुरक्षित करेल.

सूत्रांनी सांगितले की, डीआरडीओ (संरक्षण संशोधन आणि विकास संघटना) आणि ब्रह्मोस एरोस्पेस मित्रराष्ट्रांना क्षेपणास्त्र निर्यात करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. डीआरडीओने अलीकडेच अमेरिकेबरोबर मेड इन इंडिया रडार करारही केला होता. इतर काही देशांशी करारही अंतिम टप्प्यात असल्याने भारताला इतर मित्रराष्ट्रांकडून क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीची ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे.

Related Stories

सौदी अरेबियाकडून येमेनमध्ये बॉम्बवर्षाव

Patil_p

कर्नाटकात १ सप्टेंबरपासून दररोज पाच लाख जणांचे होणार लसीकरण: मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

‘विवाहात पैसे देऊन बोलावतात पाहुणे

Patil_p

तालिबानी अतिरेक्यांच्या हल्ल्यात 25 अफगाण सुरक्षा जवान ठार

datta jadhav

तिबेटी नेत्याचा पहिल्यांदाच व्हाइट हाउस दौरा

Patil_p

अफगाणिस्तानातील हिंसाचारात 11 जणांचा मृत्यू ; 39 जखमी

datta jadhav
error: Content is protected !!