तरुण भारत

राज्यात थंडीचा कडाका वाढला; बहुतांश ठिकाणचं तापमान १५ अंशांखाली

ऑनलाईन टीम / तरुण भारत

गेले काही दिवस राज्यात थंडीचा कडाका वाढला असून बहुतांश ठिकाणचं तापमान घसरले आहे. यातच राज्यातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये तर पारा शून्य अंशांवर पोहचलाय महाबळेश्वरमधील वेण्णा तलाव आणि लिंगमळा भागामध्ये तापमान शून्य अंशांपर्यंत खाली आले आहे. यातच तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस किमान तापमानात फारसा बदल होणार नसल्याने या काळात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचं स्पष्ट केले आहे. मुंबईसह कोकण विभाग आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानात मोठी घट होऊन थंडीचा कडाका वाढला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्य़ातही किमान तापमान सरासरीखाली येऊन थंडीचा जोर वाढला आहे.

Advertisements

याच बरोबर विदर्भात आणखी दोन दिवस पावसाळी वातावरण कायम राहील तर विदर्भात आणखी दोन दिवस पावसाळी वातावरण कायम राहणार असून, त्यानंतर तेथे हवामान कोरडे होईल. गुजरात, मध्य प्रदेशात थंड दिवसांची स्थिती असल्याने प्रामुख्याने मुंबईसह कोकण विभाग आणि उत्तर महाराष्ट्रातील गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानात मोठी घट होऊन थंडीचा कडाका वाढला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही किमान तापमान सरासरीखाली येऊन थंडी वाढलीय.

सध्या कर्नाटक ते दक्षिण छत्तीसगडपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे या पट्ट्य़ात काही भागात पाऊस आहे. त्याचा परिणाम विदर्भावरही होत असून, या भागात पुढील दोन दिवस पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यातील थंडीचं वातावरण कायम राहणार असल्याने नागरिकांना थंडीचा सामना करावा लागणार आहे.

Related Stories

सांगली : इस्लामपुरात पेट्रोल पंपावरच ट्रक केबिनला आग

Abhijeet Shinde

बागेश्वरनंतर आता उत्तरकाशीमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P

”कोरोनाच्या नव्या विषाणुमुळे येणारे वर्ष ही असुरक्षित”

Abhijeet Shinde

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, पुरात अनेकजण गेले वाहून गेल्याची भीती

datta jadhav

अवंतीपोरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

तालिबानी अतिरेक्यांच्या हल्ल्यात 25 अफगाण सुरक्षा जवान ठार

datta jadhav
error: Content is protected !!