तरुण भारत

गाझीपूर फुल मार्केटमध्ये सापडली स्फोटकांनी भरलेली बॅग

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिल्लीच्या गाझीपूरमधील फुल मार्केटमध्ये स्फोटकांनी भरलेली एक बॅग आढळून आल्याने खळबळ उडाली. या बॅगमध्ये आयईडी बॉम्ब होते. बॉम्बशोधक पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मार्केटजवळील एका रिकाम्या शेतात खड्डा खोदून ही स्फोटके निकामी केली.

Advertisements

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सकाळी 10.50 वाजता एका पीसीआर कॉलवर गाझीपूर फुल मार्केटमध्ये एका बेवारस बॅगेत बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तात्काळ बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचीही टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांना मिळालेल्या बॅगमध्ये स्फोटके आणि आयईडी पेरण्यात आले होते. बॉम्बनाशक पथकाने एका शेतात खड्डा खोदून हे बॉम्ब निकामी केले. या घटनेनंतर संपूर्ण परिसराची तपासणी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी एक्सप्लोजिव्ह कायद्याअंतर्गत दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

इरफान खानच्या निधनाने चित्रपट, नाट्यसृष्टीचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

Rohan_P

पुलवामा येथे कमी शक्तीचा स्फोट

Patil_p

लोकल ट्रेन सुरू करण्याच्या मागणीवरून भाजप आक्रमक; मुंबई, ठाण्यात आंदोलन

Rohan_P

कोरोना : आम्ही मूक प्रेक्षक म्हणून बसू शकत नाही – सर्वोच्च न्यायालय

Abhijeet Shinde

काँग्रेस आमदार मोरदिया अपघातात जखमी

Patil_p

युवराज सिंग कडून दिल्ली सरकारला 15 हजार एन-95 मास्कची मदत

prashant_c
error: Content is protected !!