तरुण भारत

हरिद्वारमधील धर्मसंसदेतील द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी पहिली अटक

ऑनलाईन टीम/तरुण भारत

हरिद्वारममध्ये द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी पोलिसांनी पहिली अटक केली आहे. पोलिसांनी जितेंद्र सिंह त्यागीला अटक केली आहे. दरम्यान अटकेची कारवाई केल्यानंतर यती नरसिंहानंद यांनी तुम्ही सर्व मरणार अशा शब्दांत पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला आहे. द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात यती नरसिंहानंद आरोपी आहेत.

उत्तराखंडमधील हरिद्वार येथे वादग्रस्त यती नरसिंहानंद यांनी आयोजित केलेल्या हिंदूंच्या धार्मिक मेळाव्यात मुस्लिमांविरोधात विधानं करण्यात आली होती. पोलिसांनी त्यागीला अटक केली असून ही पहिलीच अटक आहे. त्यागीला याआधी वसीम रिझवी नावाने ओळखलं जात होतं. दरम्यान उत्तराखंड पोलिसांनी याप्रकरणी यती नरसिंहानंद आणि साध्वी अन्नपूर्णा यांना हजर होण्यासाठी नोटीस बजावली आहे.

Advertisements

Related Stories

बेंगळूर : बायोकॉनच्या प्रमुख किरण मजूमदार शॉ यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

केंद्र सरकारच्या धान्य खरेदीत मोठी वाढ

Omkar B

फोन टॅपिंगची कबुली, गेहलोत सरकार वादात

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठे बळ

Patil_p

पोयला बौइशाख निमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा!

Rohan_P

‘सुवर्ण’स्वप्न भंगले; आता कांस्य पदकाची आशा

datta jadhav
error: Content is protected !!