तरुण भारत

भाजपाच्या सुमन भंडारे पंचायत समितीच्या सभापती

महाआघाडीच्या सुवर्णा कोरे यांचा दहा विरुध्द नऊ मतांनी पराभव

प्रतिनिधी / मिरज

अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या सुमन शिवाजी भंडारे यांनी बाजी मारली. त्यांनी महाआघाडीच्या सुवर्णा बाळासाहेब कोरे यांचा 10 विरुध्द 9 मतांनी पराभव केला. काँग्रेसच्या पुनम कोळी यांनी भाजपाच्या बाजूने मतदान केल्याने महाआघाडीला मोठा धक्का बसला. या निवडीसाठी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेशभाऊ खाडे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे, प्रा. मोहन वनखंडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाण मांडले होते.

सभापती निवडीत दगाफटका होऊ नये म्हणून खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी काही दिवसांपासून चर्चेला प्राधान्य दिले होते. पण, शेवटपर्यंत बहुमत निश्चित होत नसल्याने आज निवडी दिवशी त्यांनी पंचायत समिती विश्रामगृहात ठिय्याच मारला होता. यावेळी त्यांनी अनेक सदस्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, शुभांगी सावंत आणि सुनिता पाटील या शेवटपर्यंत महाआघाडी सोबतच राहिल्या. पण, काँग्रेसच्या पुनम कोळी यांनी महाआघाडीची साथ सोडून भाजपाच्या बाजूने आपले मतदान केले. त्यामुळे अटीतटीच्या या निवडीत भाजपाने शेवटच्या क्षणी दहा विरुध्द नऊ मतांनी बाजी मारली.

Advertisements

Related Stories

सांगली : पेठमधील तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Abhijeet Shinde

आधी सोबतच्यांना शिकवा, मग आम्हाला सांगा, मुख्यमंत्र्यांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर

Abhijeet Shinde

मराठा समाजाला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनमध्ये वाढ : चंद्रकांत पाटील

Abhijeet Shinde

केएसआरटीसी नीरज चोप्राला देणार आजीवन ‘गोल्डन पास’

Abhijeet Shinde

दुधगाव येथे विविध विकासकामांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Abhijeet Shinde

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीनिमित्त पीएम मोदींचे मराठीतून ट्वीट, म्हणाले…

Abhijeet Shinde
error: Content is protected !!