तरुण भारत

जिल्हा वार्षिक योजनेचा 359 कोटीचा आराखडा-पालकमंत्री जयंत पाटील

या वर्षीचा 60 टक्के निधी खर्च, उर्वरीत निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देश

सांगली / प्रतिनिधी

जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 चा आराखडा 404 कोटी 79 लाखाचा असून 13 जानेवारी २०२२ अखेर यंत्रणांनी यातील 60 टक्के म्हणजे 240 कोटी 35 लाख रूपयांचा निधी खर्च केला आहे. उर्वरीत निधी वेळेत खर्च करण्यासाठी योग्य ‍नियोजन करा. कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करा, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी सन 2022-23 साठी जिल्ह्याचा वार्षिक योजनेच्या 359 कोटी 22 लाखाच्या, आराखड्यास मंजुरी देण्यात आली. यामध्ये 274 कोटी 40 लाख जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, 83 कोटी 81 लाख अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी तर 1 कोटी 1 लाख रूपये आदिवासी घटक कार्यक्रमाकरीता समावेश करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2021-22 अंतर्गत 7 कोटी 56 लाख रक्कमेच्या पुनर्विनियोजन प्रस्तावास बैठकीत मान्यता देण्यात आली.

जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, समिती सदस्य् संजय बजाज, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव प्रत्यक्ष उपस्थित होते. तर ऑनलाईनव्दारे जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, खासदार संजय पाटील, आमदार सदाभाऊ खोत, आमदार अरूण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विक्रम सावंत तसेच समिती सदस्यड अजितराव घोरपडे, पृथ्वीराज पाटील, देवराज पाटील, दिगंबर जाधव, रमेश पाटील, अरूण बाल्टे, रवी तमणगौडा पाटील, जयश्री पाटील, अभिजीत पाटील, अनिल डुबल, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विशेष निमंत्रित सदस्य, आदि उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

सांगली : राजारामबापू कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील यांचे अपघाती निधन

Abhijeet Shinde

महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना आझमगड सीमेवर रोखले

Rohan_P

दिल्लीत दिवसभरात 956 नवे कोरोना रुग्ण; 14 मृत्यू

Rohan_P

सरकारच्या आदेशाशिवाय खाजगी शाळांनी फी वाढवल्यास होणार कारवाई : मनीष सिसोदिया

prashant_c

निर्वासितांच्या नावाखाली दहशतवाद्यांना आश्रय मिळू नये – राष्ट्राध्यक्ष पुतिन

Abhijeet Shinde

हरियाणा : सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास 500 रुपये दंड, सोबत देणार 5 मास्क

Rohan_P
error: Content is protected !!