तरुण भारत

आदिनाथ साखर कारखान्याची निवडणुक लढवणार : आमदार संजय शिंदे

करमाळा / प्रतिनिधी

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा प्रामुख्याने ऊस उत्पादकासाठी अर्थ व्यवस्थेचा कणा समजला जातो तर विधानसभा व लोकसभेसाठी महत्वाचा दुवा समजला जातो, या पार्श्वभूमिवरच निवडणुक लढवणार असल्याचे सांगत पुढच्यावर्षी कारखाना सुरु करण्यासाठी पवार कुटुंबीयांकडे पाठपुरावा करणार असल्याचे विधान आमदार संजय शिंदे यांनी केले.

आमदार शिंदे म्हणाले, आदिनाथ कारखान्याबाबत आपण राजकारण करणार नाही. मात्र हा कारखाना सुरू होण्यासाठी जे जे शक्य आहे ते करणार असून आदिनाथ पवार यांना चालवण्यासाठी देण्याचा कारखान्याच्या बोर्डाने घेतलेला निर्णय मात्र तांत्रिक बाबीत अडकला आहे. आता या कारखान्याबाबत काय करता येईल हे पाहिले जात आहे. येणाऱ्या निवडणुकीत निवडणुक लढवली जाईल. त्यानंतरही पवार हे कारखाना चालवणार असतील तर त्यांच्याकडे यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.यानंतर आमदार शिंदे यांच्या कार्यालयात पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

Advertisements

Related Stories

इंधन दरवाढीचा भडका सुरूच

Rohan_P

शाळांचे तास, अभ्यासक्रम कमी करण्याचा विचार सुरू : डॉ. रमेश पोखरियाल यांची माहिती

Rohan_P

डॉ. हर्षवर्धन आज स्वीकारणार WHO च्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे

datta jadhav

बेलवळे बुद्रुक येथे ५५ एकर ऊस जळून खाक; पाच लाखाचे नुकसान

Sumit Tambekar

आपत्ती नियंत्रण निधीतील 50 टक्के रक्कम वापरा

Omkar B

करवीरकराना हवं आहे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!