तरुण भारत

माजी महापौर विठ्ठल जाधव विरुद्ध फसवणुकीचे चार गुन्हे

प्रतिनिधी / सोलापूर

मंडलाधिकारी तसेच तलाठ्याला हाताशी धरून बनावट उतारे तयार करून घेतले त्यानंतर ते खरे असल्याचे सांगून प्लॉट विक्री केल्याप्रकरणी माजी महापौर विठ्ठल करसु जाधव यांच्या विरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाले आहेत.

सातबारा उतारा खोटे आहेत, हे माहीत असूनही ते सातबारा उतारे खरे आहेत असे सांगत जागा खरेदी करून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. माजी महापौर विठ्ठल करबसु जाधव याच्यासह तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर सदर बाजार पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत चंद्रकांत काशिनाथ हेडगिरे (वय ४९, रा. शिवरत्न नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

१९९२ ते २००७ या कालावधीमध्ये बनावट सातबारा उताराच्या माध्यमातून मोदी परिसरातील १५पेक्षा जास्त प्लॉट खरेदी करून घेत सातबारावर स्वतःचे नाव लावले. मोदी परिसरातील जुने सर्वे नंबर ३६२,६२२ मधील विविध प्लॉटमध्ये अशाप्रकारे आरोपी जाधव याने स्वतःचे नाव लावून घेतले. तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जाधव याने शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी सोलापूर चंद्रकांत हेडगिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात एकूण चार गुन्हे दाखल झाले आहेत. यात विठ्ठल करबसू जाधव, सिद्धप्पा हनुमंतप्पा गट्टे, भिमराज कुळाजी परमार, सोमनाथ विठ्ठल जाधव, परशुराम मरगु जाधव आणि तत्कालीन मंडलाधिकारी तलाठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनांचा तपास सदर बझार पोलीस करत आहेत.

Advertisements

Related Stories

सोलापुर: विषाणू प्रसार रोखण्यासाठी वैद्यकीय पथक पाठवणार

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात 76 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, सात जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कळंबा कारागृहात पुन्हा सिमकार्ड

Abhijeet Shinde

बोंडले येथील तरुण उजनी कालव्याच्या पाण्यात बेपत्ता

Abhijeet Shinde

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी आणि टँकर अपघातात एक ठार

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीण भागात बुधवारी 258 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, 8 जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!