तरुण भारत

माजी महापौर विठ्ठल जाधव विरुद्ध फसवणुकीचे चार गुन्हे

सोलापूर : प्रतिनिधी

मंडलाधिकारी तसेच तलाठ्याला हाताशी धरून बनावट उतारे तयार करून घेऊन प्लॉट विक्री केल्याप्रकरणी माजी महापौर विठ्ठल करसु जाधव यांच्या विरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

खोटे सातबारा उतारे खरे सांगून जागा खरेदी करून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. माजी महापौर विठ्ठल करसु जाधव याच्यासह तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर सदर बाजार पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत चंद्रकांत काशिनाथ हेडगिरे (वय ४९, रा. शिवरत्न नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

१९९२ ते  २००७ या कालावधीमध्ये बनावट सातबारा उताराच्या माध्यमातून मोदी परिसरातील १५ पेक्षा जास्त प्लॉट खरेदी करून घेत सातबारावर स्वतःचे नाव लावले. मोदी परिसरातील जुने सर्वे नंबर ३६२, ६२२ मधील विविध प्लॉटमध्ये अशाप्रकारे आरोपी जाधव याने स्वतःचे नाव लावून घेतले. तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जाधव याने शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी सोलापूर चंद्रकांत हेडगिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात एकूण चार गुन्हे दाखल झाले आहेत. यात विठ्ठल करसू जाधव,  सिद्धप्पा हनुमंतप्पा गट्टे, भिमराज कुळाजी परमार, सोमनाथ विठ्ठल जाधव, परशुराम मरगु जाधव आणि तत्कालीन मंडलाधिकारी, तलाठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनांचा तपास सदर बझार पोलीस करत आहेत.

Advertisements

Related Stories

मंत्री जयंत पाटीलांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट

Abhijeet Shinde

केरळची पुनरावृत्ती; कोल्ह्याला खायला घातले स्फोटके भरलेले मांस

datta jadhav

महाराष्ट्रात 3,663 नवीन कोरोनाबाधित

Rohan_P

ज्येष्ठ साहित्यिक, कवी तथा पत्रकार अशोक नाईक तुयेकर यांचे निधन

Sumit Tambekar

नागपूरमध्ये 42 नवे कोरोना रुग्ण; एकूण संख्या 1076

Rohan_P

ओमियक्रॉनचा महाराष्ट्रात आणखी दोघांना संसर्ग

datta jadhav
error: Content is protected !!