तरुण भारत

“कंगनाच्या गालापेक्षाही जास्त सुंदर रस्ते बनवू”

ऑनलाईन टीम / तरुण भारत

जळगाव येथे गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. पाटील यांनी सिने अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालाची तुलना आपल्या मतदारसंघातील रस्त्यांशी केली होती. यामूळे हा मुद्दा बरेच दिवस राज्याच्या राजकिय पटलावर चांगलाच चर्चिला गेला होता. याच पार्श्वभूमीवर आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असणारे झारखंड जामताडाचे डॉ. इरफान अन्सारी यांनी कंगनाच्या गालापेक्षाही जास्त सुंदर रस्ते बनवू असं विधान केल्याने ते पुन्हा आपल्या वक्तव्यावरुन चर्चेत आले आहेत.

यावेळी अन्सारी यांनी आपल्या परिसरातील रस्त्याची तुलना सिने कलाकार कंगना रनौटच्या गालाशी केली आहे. त्यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ केला आहे. हा व्हिडिओ सध्य़ा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कंगणाच्या गालापेक्षाही जास्त सुंदर रस्ते आम्ही बनवणार आहोत त्यामुळे आदिवासी मुले. तरुण आणि व्यापारी वर्गाला याचा मोठा फायदा होईल. असे अन्सारी यांनी म्हटले आहे.

अन्सारी यांनी आपल्या मतदारसंघासाठी सरकारकडून 14 रस्ते मंजुर करुन घेतले आहेत. या रस्त्याच्या बांधकामासंदर्भात बोलताना अन्सारी यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामूळे भाजप या संसर्दभात आपली भुमिका नेमकी काय मांडणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच रस्त्याची तुलना कंगनाच्या गालाशी केल्याने आता कंगनाकडून याप्रकरणी काय उत्तर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisements

Related Stories

आर्यन खानसाठी जुही चावला बनली जामीनदार

datta jadhav

कुदनूर येथील तरुणांकडून ‘लॉकडाऊन’ चा सदुपयोग

Abhijeet Shinde

दिल्ली दंगलप्रकरणी उमर खालिदला बेडय़ा

Patil_p

तृणमूल कार्यकर्त्यांची सीबीआय कार्यालयावर दगडफेक

Abhijeet Shinde

नव्या बाधितांचा चढता आलेख कायम

Patil_p

राज्यात 31 मे रोजी मान्सून दाखल होणार

Patil_p
error: Content is protected !!