तरुण भारत

अभिनेत्री रेखा यांच्या गाण्यावर धनश्रीची दिलखेचक अदाकारी

झी युवावर नुकताच ‘युवा डान्सिंग क्वीन’ हा नवा कार्यक्रम सुरू झालेला आहे.  14 नर्तिकांच्या दिलखेचक अदा, अद्वैत दादरकरचे सूत्रसंचालन तसेच सोनाली कुलकर्णी आणि मयूर वैद्य यांचे परीक्षण यांच्या जोरावर या कार्यक्रमाने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेली आहे. सेलिब्रिटी नफत्यांगना आणि त्यांच्या ‘डान्सचा जलवा’ हे या कार्यक्रमाचे एक वैशिष्टय़ आहे. याचाच एक भाग म्हणून धनश्री काडगावकरने अभिनेत्री रेखाजींच्या गाण्यावर अप्रतिम नफत्य सादर केले.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून धनश्री काडगावकर घराघरांत पोचली आहे. एक गुणी अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केल्यानंतर आपली नफत्यकला दाखवण्याची संधी ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या माध्यमातून तिला मिळालेली आहे. या संधीचे तिने पूरेपूर सोने केलेले असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या उत्कृष्ट नफत्याच्या जोरावर तिने प्रेक्षक आणि परीक्षकांना प्रभावित केलेले आहे. स्पर्धेतील मागच्या आठवडय़ात, बॉलीवूड अभिनेत्री रेखाजी यांच्या ‘उमराव जान’ या चित्रपटातील ‘इन आँखो की मस्ती मैं’ या गाण्यावर धनश्रीने आपले बहारदार नफत्य सादर केले. तिच्या रमणीय अदांनी साऱयांच्या मनात छाप पाडली. परीक्षक सुद्धा खूपच खुश झालेले पाहायला मिळाले. आपल्या लाडक्या अभिनेत्रीच्या गाण्यावर सादरीकरण केल्यानंतर लूक्स आणि परफॉर्मन्सची झालेली तारीफ ऐकताना धनश्री आनंदी झालेली पाहायला मिळाली. याविषयी बोलताना धनश्री म्हणाली, मी रेखाजींची खूप मोठी पॅन आहे. युवा डान्सिंग क्वीनच्या माध्यमातून इतक्या मोठय़ा मंचावर त्यांच्या गाण्यावर नफत्य सादरीकरण करण्याची संधी मला मिळाली; याचा मला फार आनंद झाला. मी स्वत: भरतनाटय़म् शिकेलेली आहे. पण या गाण्यावरील कोरिओग्राफी पूर्णपणे कथ्थक या नफत्यप्रकारावर अवलंबून आहे. हे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान होते. रेखाजींची बरोबरी करणे अर्थातच कुणालाही शक्य होणार नाही. मी माझ्यापरीने सर्वोत्तम सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला. परीक्षकांना हे नफत्य आवडले याचा खूपच आनंद झाला आहे.

Advertisements

Related Stories

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर आक्षेपार्ह पोस्ट, तरुणाला अटक

triratna

आदित्य धर याच्याशी यामी गौतम विवाहबद्ध

Patil_p

शिवानी सुर्वेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

prashant_c

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा बायोपिक लवकरच पडद्यावर

Patil_p

डॉक्टर डॉनच्या सेटवर लकी अलीच्या गाण्यांची मैफिल

Patil_p

स्वाभिमान मालिकेतून आसावरी जोशी येणार भेटीला

Patil_p
error: Content is protected !!