तरुण भारत

मराठी मुलांची शाळा क्र.35, मजगाव

देशाचे नागरिक घडविण्याची पहिली पायरी म्हणजे शाळा. स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षणाचा वसा जपणाऱया अनेक शाळांनी शताब्दीचा टप्पा पार केला. गावाच्या विकासात शाळांची महत्वपूर्ण भूमिका आहे. शैक्षणिक विकासाची ज्ञानपीठे म्हणून शाळा प्रत्येकासाठी वंदनीयच असते. सध्याच्या वातावरणात शिक्षणाची विविध द्वारे निर्माण झाली आहेत. मात्र त्यातही शैक्षणिक विकासाची परंपरा लाभलेल्या व शैक्षणिक प्रगतीच्या वाटचालीची साक्ष देणाऱया शताब्दी पूर्ण शाळा आजही तितक्मयाच दिमाखात शैक्षणिक वसा जोपासत आहे.

सरकारी मराठी मुलांची शाळा क्र. 35 मजगांव. शहराचाच भाग असणाऱया व शहराला लागून असलेल्या मजगांवमधील ही शाळा 1890 साली स्थापन झाली. भव्य इमारत, उपक्रमशील शिक्षक, भौतिक सुविधांनीयुक्त, ग्रामस्थ आणि एसडीएमसीची साथ, यामुळे स्पर्धेच्या युगातदेखील गगनभरारी घेत आहे. पटवर्धन संस्थानिकांच्या काळात राजेमहाराजांच्या पुढाकारातून 1890 साली कौलारु इमारतीत शाळेची स्थापना करण्यात आली. आज शाळेच्या स्थापनेला 130 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1997 साली शिक्षण विभागाच्या पुढाकारातून ग्रामस्थांच्या मदतनिधीतून आणि सहकार्यातून मलनाड प्रदेश, अभिवृद्धी मंडळ, शिमोगा मलनाड प्रदेश अभिवृद्धी योजनांतर्गत शाळेची नवीन इमारत उभी राहिली.

Advertisements

शाळेला मोठी परंपरा

शाळेने अनेक विद्यार्थी घडविले आहेत. 500 ते 700 विद्यार्थी संख्या असणाऱया शाळेला मोठी परंपरा लाभली आहे. गावातील पहिली शाळा म्हणून या शाळेची ओळख असून या ठिकाणी सर्व जाती धर्माचे आणि भाषेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. आदर्श शाळा म्हणून शाळेची ओळख असून मजगांवबरोबरच राजारामनगर, ज्ञानेश्वर नगर, महावीरनगर, ब्रम्हनगर या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी लाभली. गावातील प्रत्येक व्यक्ती या शाळेचा विद्यार्थी ही परंपरा शाळेने जोपासली आहे.

मदतीचा हात नेहमी साथ

शाळेच्या प्रगतीत शाळा सुधारणा समिती, ग्रामस्थांचे सहकार्य, देणगीदारांची मदत  यांची नेहमी साथ राहिली आहे. शाळा इमारतीच्या बांधकामापासून मागील वर्षापासून शाळेच्या रंगरंगोंटीचे काम मदतीतूनच पार पडले आहे. शिक्षकांचे प्रयत्न आणि मदतीचा हात यामुळे शाळेची प्रगती झाली आहे. यामध्ये पालकांचे सहकार्यदेखील मोलाचे आहे. बदलत्या काळानुरुप विद्यार्थ्यांना उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी गणवेश देण्यापासून ते आय.डी, टाय देण्यासाठी पालक आणि शिक्षकांचा पुढाकार खूप महत्वाचा आहे. एसडीएमसी अध्यक्ष हिरामणी अनगोळकर व युवा कार्यकर्ते प्रसाद काकतकर याचा शाळेच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे.

कार्यरत शिक्षक

शाळेच्या स्थापनेपासून अनेक शिक्षकांनी शाळेच्या प्रगतीत महत्वपूर्ण वाटा उचलला आहे. मागील दोन वर्षांपासून प्रभारी मुख्याध्यापकपद नुकतेच कायमस्वरुपी मुख्याध्यापक म्हणून भरण्यात आले आहे. सध्या शाळेत आर. के. उत्तुरकर हे मुख्याध्यापकपदी कार्यरत आहेत. तर वरि÷ शिक्षक एम. डी. शिंदे, व्ही. बी. गावडे, एन. बी. कडलीकर, एस. के. भातकांडे हे शिक्षक शाळेत सेवा बजावत आहेत.

उपक्रमशील शिक्षणाचा ध्यास

शाळेत विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुरुप उपक्रमशील शिक्षण देण्याचा ध्यास शाळेने घेतला आहे. त्यानुसार विविध स्पर्धा तसेच शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. पुढील काळात डिजिटल क्लासरुम तयार करण्याचा मानस असून त्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.

शाळेची स्थापना इ.स. 1890

वर्ग इ. 1 ली ते 7 वी

शाळेची परंपरा 130 वर्षे

नवीन इमारतीत स्थलांतर इ.स.1997

शाळेच्या वर्गखोल्या-14

शिक्षकवृंद 5

   राधिका सांबरेकर

Related Stories

हवी फक्त इच्छाशक्ती

tarunbharat

चायनिजपासून सावधान !

tarunbharat

कचऱयाचा पुनर्वापर

Patil_p

प्रदूषणापासून सावध व्हा !

Patil_p

‘सुहास्य’ फुलविणारे अरुण जाधव

Patil_p

नव्या युगातील आपण

Patil_p
error: Content is protected !!