तरुण भारत

अंमलीपदार्थाला सरकारचेच अभय!

गिरीश चोडणकर यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ पणजी

Advertisements

भाजप सरकार अमलीपदार्थाला पूर्णपणे अभय देत आहे. त्यामुळेच राज्यात अमलीपदार्थाचा सुळसुळाट वाढला आहे. सनबर्न काळात तीन तरूणांचा मृत्यू झाला त्याला सरकार जबाबदार आहे. अंमली पदार्थाच्या अतिसेवनाने त्या तिघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट निधान मंत्री मायकल लोबो यांनी केले आहे. सरकार अमली पदार्थाकडे दुर्लक्ष करीत आहे. कारण भाजपचा तो कौटुंबिक व्यवसाय झाला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला.

 गोव्याचे पोलीस आणि अमलीपदार्थ विरोधी विभाग कुचकामी ठरला आहे. गोव्याबाहेरून येऊन पथके गोव्यात अमलीपदार्थ पकडतात. पणजी मनपा अमलीपदार्थ शोधून काढले. पण पोलीस त्याची चौकशी करू शकत नाही. सरकार अमलीपदार्थाच्या  आधीन झाले आहे. कारण भाजपचे काही लोकच या व्यावसायालत आहेत असेही ते म्हणाले.

100 किलो कॅटमईनचे काय झाले

भाजपचे कार्यकर्ते वासुदेव परब यांच्या शेडमध्ये 100 किलो कॅटामाईन सापडले. पण त्याची चौकशी कुठे झाली. असा प्रश्न त्यानी उपस्थित केला. 1 ग्रॅम अंमली पदार्थ सापडल्यास त्या व्यक्तीला अटक होते. पण 100 किलो कॅटामाईन सापडले तरीही चौकशी होत नाही. कारण परब हे भाजपचे कार्यकर्ते. त्यामुळे हे प्रकरण दाबून टाकले. कार्यकर्तेच जर अमलीपदार्थ व्यावसायात आहेत तर सरकार कारवाई कशी करणार हा प्रश्नही त्यानी उपस्थित केला. वासुदेव परब यांनी आयडीसीकडून शेड घेऊन परस्पर सबलीज केली होती व त्या शेडमध्ये 100 किलो कॅटामाईन सापडले. शेड सबलीज करणे हा मोठा गुन्हा. पण आयडीसीनेही कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे सरकारने हे प्रकरण व्यावस्थितपणे दाबले हे स्पष्ट होते असेही ते म्हणाले.

पर्यटनमंत्री बेजबाबदारपणे वागतात.

सनबर्नकाळात तीन तरूणांचा अंमली पदार्थ सेवनाने मृत्यू झाला असे असताना पर्यटनमंत्री बाबु आजगाकर सनबर्नमध्ये जाऊन डान्स करतात. त्याचबरोबर वर्षाला दोन सनबर्न व्हायला हवे अशी विधाने करतात यावरून पर्यटनमंत्री किती जबाबदारीने वागतात हे स्पष्ट होते. खरे म्हणजे पर्यटनमंत्री या नात्याने त्यानी या तीन तरूणांच्या मृत्युबद्दल हळहळ व्यक्त करायला हवी होती. गोवा हे पर्यटनस्थळ आहे. अतिथी देवो भव म्हणून तुम्ही नारा लावता आणि इथे पर्यटक अमलीपदार्थाच्या सेवनाने मृत्युमुखी पडतात.

 गोवा हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जावे, पर्यटकांचे मृत्युस्थळ म्हणून नव्हे याचे भान पर्यटन मंत्र्यांनी ठेवावे. सनबर्नचा पर्यटन मंत्र्यांनी धरलेला आग्रहच मुळी संशयाच्या घेऱयात आहे. पर्यटन मंत्र्यानी घेतलेल्या भुमिकेमुळे आणि विधानाने गोव्याची लाज काढली असेही चोडणकर म्हणाले.

Related Stories

सुकूर पंचायतीवर भाजपचे वर्चस्व यापुढेही राहणार

Omkar B

रामभवन – कुंभारजुवे येथे रस्त्याचे उद्घाटन

Amit Kulkarni

गोव्याबाहेरुन आलेले 7 जण कोरोना बाधित

Patil_p

मगोपचे 18 उमेदवार निश्चित

Omkar B

दिवसभरात 39 बळी, 1549बाधित,2082 जण कोरोनामुक्त

Amit Kulkarni

वेर्णा महामार्गावरील अपघातात कारचालक महिला जागीच ठार

Patil_p
error: Content is protected !!