तरुण भारत

आयरिश पंतप्रधानांची वराडला भेट

मोरजी/प्रतिनिधी

आपले वडिल जन्माने हिंदू आणि आई ख्रिश्चन धर्मिय असली तरी आपल्याला दोन्ही धर्माबद्दल नितांत आदर आहे आणि धार्मिक सलोख्यातूनच जगात शांती नांदू शकते यावर माझा दृढ विश्वास आहे आपली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी यापूर्वी भेट   झाली आहे. आपण पुन्हा त्यांची भेट घेण्यास इच्छूक असुन त्यातुन     भारत आणि आयर्लंड देशातील अधिक द्रढ होतील असा विश्वास भारतीय वंशाचे आयरिश पंतप्रधान सिंधुदुर्गातील वराड गावचे सुपूत्र डॉ लिओ वराडकर यांनी केले 

Advertisements

डॉ वराडकर यानी रविवारी आपल्या कुटूंबियासह आपल्या मालवण तालूक्मयातील वराड या वडिलोपार्जित   मुळ   गावाला भेट दिली त्यावेळी कट्टा येथील सेंट जोसेफ चर्चला भेट दिली त्यावेळी चर्चतर्फे झालेल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत वडिल अशोक वराडकर,आई मेरियन वराडकर,बहिणी सोफिया,सोनिया, चुलत बहिण शुभदा वराडकर,भावोजी केनान

पांडूरंग वराडकर,अरविंद वराडकर,अविनाश वराडकर आदी उपस्थित होते डॉ लिओ वराडकर यांचा प्रथमच आपल्या वडिलांच्या गांवी खासगी दौरा आयोजित केला होता यावेळी केथॉलिक चर्च असोशिएशन तर्फे आर्चबिशप ऑल्वनि बार्रेटो,विक्टर डान्टस,फादर ऑल्वनि डायस यांनी स्वागत केले व चर्च मध्ये प्रार्थना सभा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते या चर्च बांधणी साठी त्यांच्या वडिलांनी मोफत जमिन दिली होती तत्पूर्वी डॉ वराडकर यांनी वराड गावातील ग्रामदैवताला भेट दिली त्यावेळी बोलताना ते म्हणाले आपल्या पंतप्रधान पदाच्या निवडणुकी वेळी माझ्या गांववासियानी तसेच कुटूंबियानी ग्रामदेवतेकडे प्रार्थना करून माझ्या विजयासाठी नवस केला होता असे माझ्या वडिलांनी मला सांगितले होते तो नवस गावात येऊन फेडावा अशी सर्वाचीच इच्छा होती माझा देवदेवस्कीवर तितका विश्वास नसलातरी प्रार्थनेत मोठी शक्ती असते यावर माझा द्रढ विश्वास आहे माझ्यासाठी गांवकर्यानी केलेल्या प्रार्थनेचा मला निश्चितच फायदा झाला आहे त्यांच्या सदिच्छा कामी आल्या यापुढेही येतील त्यामुळेच आपली ही सदिच्छा भेट होती असे त्यानी क्रतन्यतापूर्वक सांगितले गावकर्यांच्या आदरतिथ्याने आपण व आपले कुटूंबिय भाराऊन गेल्याचे सांगून 

भारतीयांचा हा “अतिथी देवो भव” सिध्दांत जगाने घेतल्यास जगात सुखसम्रध्दी आपोआप नांदेल अश्या शब्दात क्रतन्यता व्यक्त केली 

वराड हायस्कूलला 4 लाख देणगी

डॉ लिआ? वराडकर यांनी रविवारच्या आपल्या भेटीत वराड हायस्कूलला भेट दिली यावेळी त्यानी हायस्कूलला दिलेल्या 4 लाखाच्या देणगीतून बांधलेल्या वर्ग खोल्यांचे आपल्या हस्ते उद्घाटन केले 

यावेळी ग्रामस्थानी व विद्यार्थ्यानी जल्लोषी स्वागत केले गाडीतुन उतरल्यानंतर डॉ लिओ यानी भारतीय पध्दतीने गांवकर्याना नमस्कार केला यावेळी त्याच्यासोबत कुठल्याही प्रकारचा सरकारी लावाजमा वा सुरक्षा रक्षकही नव्हता हे विशेष   याविषयी त्यांच्या वडिलांना प्रश्न केला असता ते म्हणाले की आपल्या लोकांत येताना सुरक्षा हवीच कशाला?आपले लोकच ही मोठी सुरक्षा   असल्याचे सांगून लिओ पंतप्रधान झाला तरी आजही सायकलवरुन बिनधास्त फिरतो असे ते म्हणाले 

यावेळी उपस्थितानी डॉ लिओ यांच्या सोबत सेल्फी घेतल्या डॉ लिओ यानी बिनधास्त सर्वाना पोज दिल्या हे विशेष

Related Stories

कोरोना बळींबाबत संतोष यांनी सरकारला जाब विचारावा

Omkar B

झुआरीनगरातील कंटेनमेंट झोनभोवती पोलीस सुरक्षा अधिक कडक करणार

Patil_p

मडगाव, वास्कोहून येणाऱया गाडय़ा आता मांडवी पुलावरून

Amit Kulkarni

दाबोळी भाजपातर्फे चिखली व बोगमाळोत योग शिबिरे, मंत्री माविन गुदिन्हो यांनीही केले मार्गदर्शन

Amit Kulkarni

शेळ मेळावलीप्रकरणी मंत्री गोविंद गावडे यांनी भूमिका स्पष्ट करावी

Patil_p

आता संयुक्तपणे लढणार

Omkar B
error: Content is protected !!