तरुण भारत

मेंढपाळाचा मुलगा बनला तहसीलदार

 सुनील कोळी/   खडकलाट

धनगर समाज म्हटले की आपल्या समोर येते ते हातात काठी, पायात पायतान, डोक्यावर फेटा, खांद्यावर घोंगडे, अंगात नेहरु शर्ट, धोतर आणि शेतात मेंढपाळ करणारा तो बांधव इतकंच. पण नवलिहाळ (ता. चिकोडी) येथील मल्लेश बिराप्पा पुजारी यांनी चिकोडी तालुक्यात धनगर समाजातून सरळ केएएस परीक्षा उत्तीर्ण होऊन थेट तहसीलदार होण्याचा मान मिळवला. त्यामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Advertisements

वडील बिराप्पा पुजारी हे कधीही शाळेला गेले नाहीत. आई अशिक्षित असली तरी आपण परंपरागत अनेक वर्षांपासून चालत आलेला मेंढपाळाचा व्यवसाय आपली मुले करु नयेत, यासाठी आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी रोज काबाडकष्ट करत असे.

मल्लेश यांचा जन्म नवलिहाळ येथे झाला. पण मेंढपाळ करीत इकडे-तिकडे हिंडणाऱया त्याच्या वडिलांनी दक्षिण कन्नड जिल्हय़ातील कामनहळ्ळी गावात आपल्या उदरनिर्वाहासाठी थोडी शेती घेऊन त्याच गावात स्थायिक झाले. पण नवलिहाळ गावातही घर-शेती असल्याने त्याचे नवलिहाळ येथे येणे जाणे होतेच. मल्लेश यांचे प्राथमिक शिक्षण कामनहळ्ळी गावातील सरकारी कन्नड शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण आळकी (जि. दक्षिण कन्नड) येथील आश्रम शाळेत झाले. पहिल्यापासूनच वर्गात हुशार असल्याने प्रत्येकवर्षी वर्गात पहिला अथवा द्वितीय क्रमांक नक्की असायचा. 12 वीला 90 टक्के गुण मिळाले. त्यावेळी म्हैसूर येथील एनआयई महाविद्यालयातून मॅकॅनिकल इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण केले. 2017 च्या केएएस परीक्षेत कर्नाटकातून 428 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये 11 व्या क्रमांकाने मल्लेश पुजारी उत्तीर्ण होत राज्यात गावचे व आई-वडिलांचे नाव उज्ज्वल केले. त्यांची तहसीलदार पदासाठी निवड झाली.

प्रतिक्रिया

आयएएस परीक्षेसाठी प्रयत्न करणार

आई-वडील अशिक्षित असल्याने त्यांना आयएएस म्हणजे हेच माहित नसल्याने त्यांना जास्त न सांगता आपण सन 2015 पासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. वडिलांना मदत म्हणून बेंगळूर येथील आयएएलच्या एन्स्टाड्स या केंद्रात मेंटरशीप म्हणून काम करु लागलो. या कामातून मिळणारा पगार खोली भाडे व जेवणास खर्च होत होता. केएएस परीक्षा उत्तीर्ण झालो असले तरी आयएएस परीक्षेसाठी प्रयत्न करणार आहे.

– मल्लेश पुजारी

Related Stories

युनियन बँक रिटायर्ड असोसिएशनच्या सदस्यांची जनकल्याण सेवा ट्रस्टला देणगी

Amit Kulkarni

बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू

Patil_p

गवाण फाटय़ानजीक कांद्याचा ट्रक उलटला

Patil_p

कोरोना योद्धय़ांना अनगोळमध्ये लसीकरण

Amit Kulkarni

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे तिथीनुसार शिवपुण्यतिथी गांभीर्याने

Amit Kulkarni

होनगा भागात खरीप पिकांची उगवण उत्कृष्ट

Amit Kulkarni
error: Content is protected !!