तरुण भारत

2020 मध्ये ‘चंद्रयान-3’ च्या उड्डाणासाठी सरकारची मंजूरी

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

इस्त्रोने पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली असून इस्त्रो 2020 मध्ये गगनयान आणि चांद्रयान-3 मोहीम लॉन्च करणार आहे. तसेच या मोहिमेसाठी सरकारने देखील मान्यता दिली असल्याची माहिती इस्त्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.

Advertisements

के सिवन म्हणाले, गगनयानच्या अंतराळवीरांना जानेवारीच्या महिन्याच्या तिसऱया महिन्यापासून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली जाणार आहे. तसंच गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, चांद्रयान-2 मोहिमेवर आम्ही चांगली प्रगती केली होती. लँडर चंद्राच्या पृष्टभागावर आदळून तुटला असला तरी चांद्रयान-2 मोहिमेवेळी पाठवलेले ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे कार्यरत आहे. तसेच पुढील सात वर्षांपर्यंत ऑर्बिटर कार्यरत राहणार असल्याचे के. सिवन यांनी सांगितले.

 

Related Stories

राहुल गांधींची पुन्हा मोदी सरकारवर टीका ; म्हणाले, ‘सदियों का बनाया, पलों में मिटाया’

Abhijeet Shinde

सीबीएसई १२ वीची परीक्षा रद्द करा!

Patil_p

शॉपिंग मॉल्समध्येही मिळणार महागडी, विदेशी दारू

datta jadhav

टेस्ट, ट्रॅक आणि ट्रिट त्रिसूत्री पुन्हा वापरण्याची गरज

datta jadhav

खमींगर ग्लेशियरमध्ये 12 ट्रेकर्स अडकले; दोघांचा थंडीने मृत्यू

datta jadhav

भारतीय तांदळाला चीनचे आव्हान

Patil_p
error: Content is protected !!