तरुण भारत

सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत सेवा संस्थांना टाळेच

टोप / वार्ताहर

शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी करावी. जो पर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही, तो पर्यंत सेवा संस्थेचे टाळे काढणार नसल्याचा इशारा टोप व दक्षिनवाडी येथील नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांनी दिला. तर, टोप येथील छत्रपती राजाराम विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, श्री.दत्त विकास सेवा संस्था, श्री वसंत विकास सेवा संस्था दक्षिणवाडी व श्री. राम विकास सेवा संस्था टोप या चार संस्थांना टाळे ठोकले. हे आंदोलन केशवराव गायकवाड, भगवान पाटील, भिमराव पाटील विजयसिंह पाटील (गब्बर ) उदय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

Advertisements

जोपर्यंत शासन सरसकट कर्जमाफी देत नाही तो पर्यत टाळे काढणार नसल्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे. संस्थेचे सर्व कामकाज ठप्प आहे. यावेळी शेतकर्यांनी शासनाच्या धोरणा विरोधात घोषणाबाजी केली.

टोप येथील छत्रपती राजाराम, श्री.दत्त, श्री. राम व श्री.वसंत या चार संस्थाच्यावतीने शेतकर्‍यांना वर्षाला उस, खावटी, मध्यम मुदतीचे अशी विविध प्रकारची कर्जे ७ ते ८ कोटी रुपयेपर्यंत वितरण केले जात आहे. या संस्थाचा कारभार पारदर्शक चालत आहे. ज्या शेतकरी सभासदानी सन २०‍१८१९ च्या कर्जातून शेतकऱ्यांनी नांगरट, कुळवणी, उसाची बी बियाणे, लागवड, भांगलण, भरणी औषध फवारणी आदी. कर्जे भागवले मात्र शेतकर्‍यांचे तेच पिक अतिवृष्टी ने नष्ट झाले. त्या सभासदाना कर्जमाफी होणे गरजेचे आहे. पण राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपयांची कर्ज माफी जाहीर केली आहे. पण या संस्थेकडे केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच सभासद थकबाकीत आहेत. शासनाच्या या कर्जमाफी योजनेचा लाभ प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणार्या सभासदांना होणार नाही. त्यामुळे हा निर्णय प्रामाणिक शेतकऱ्यांना अन्याय कारक आहे. शासनान लागु केलेली कर्जमाफी चुकीची असुन सरसकट कर्ज माफी द्यावी. यासाठी शेतकरी सभासदांनी संस्थेच्या कार्यालयास बेमुदत टाळे ठोकले.

यावेळी बाळासो पाटील, श्रीपती पाटील, सागर भोसले, राजाराम पाटील, प्रताप पाटील, विजयसिंह घोरपडे, अभिजीत मुळीक यांनी शासन धोरणाचा निषेध केला. यांचेसह शेतकरी सभासद मोठ्या संस्थेने उपस्थित होते.

Related Stories

`सारथी’ला भक्कम करा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : औरवाडमधील 12 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

‘गोकुळने म्हैस दूध दर प्रति पॉईंट चाळीस पैसे करावे’

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात 25 नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापुरात कोरोना केअर सेंटरचे `सॅनिटायझेशन’ सुरू

Abhijeet Shinde

गिरगावात जिल्ह्याबाहेरुन आलेल्यांना गृह अलगीकरणात ठेवणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!