तरुण भारत

तिन्ही दलांमध्ये समनव्य ठेवण्याची जबाबदारी : बिपिन रावत

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

जनरल बिपीन रावत यांची केंद्र सरकारकडून संरक्षण प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) निवड करण्यात आल्यानंतर आज त्यांनी पदभार स्वीकारला आहे. भारतीय लष्कराकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

Advertisements

त्यानंतर बोलताना रावत म्हणाले, लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये समनव्य ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तिन्ही दल एक टीम म्हणून एकत्र काम करतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

बिपिन रावत यांना यावेळी तुमच्यावर ठराविक राजकीय विचारसरणीचा प्रभाव असल्याच्या आरोपांसंबंधी विचारले असता ते म्हणाले, लष्कर राजकारणापासून दूर राहतं. जे सरकार सत्तेत आहे त्याच्या आदेशानुसार आम्हाला काम करावं लागते.

दरम्यान, गार्ड ऑफ ऑनर घेतल्यानंतर त्यांनी तिन्ही दलाच्या प्रमुखांची भेटही घेतली. त्याआधी सकाळी रावत यांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकस्थळी जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

 

Related Stories

ओडिशा विधानसभेत भाजप आमदाराचा सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

datta jadhav

देशात दिवसभरात 991 नवे रूग्ण

Patil_p

भारत-चीनमधील तणाव नियंत्रणात

datta jadhav

संपूर्ण लोकसंख्येसाठी लसीकरण आवश्यक नाही!

Patil_p

भाजीविक्रेत्याचा मुलगा 10 वीत पहिला

Patil_p

पंतप्रधानांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Patil_p
error: Content is protected !!