तरुण भारत

अयोध्येत मशीदीसाठी जागा निश्चित केलेली नाही : अवनीश अवस्थी

ऑनलाइन टीम / लखनऊ : 

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार मुस्लिम पक्षकारांना देण्यासाठी पाच एकर जागा निश्चित करण्यात आल्याचे वृत्त उत्तर प्रदेश सरकारने फेटाळले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकालात मुस्लिम पक्षकारांना पाच एकर जागा देण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात काही माध्यमांमध्ये वृत्त आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने ते फेटाळले.

Advertisements

राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी म्हणाले, या संदर्भात सोशल मीडीयावर पसरलेल्या बातम्या खोटय़ा आहेत. मशीदीसाठी अजून कोणतीही जागा निश्चित करण्यात आली नाही आहे. तसेच राज्य सरकारने या स्वरुपाचा कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही.

दरम्यान, अयोध्येतील पंचकोशी परिक्रमेबाहेर जमीन निश्चित करण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. अयोध्येतील 15 किलोमीटरच्या पंचकोशी परिक्रमा परिघात सर्व मंदिरे आहेत. त्याबाहेर मुस्लिम पक्षकारांसाठी जमीन निश्चित करण्यात आल्याचे वृत्त होते. पण सरकारने ते फेटाळले.

 

Related Stories

बिहारमध्ये 581 नवे कोरोना रुग्ण; 7 मृत्यू

Rohan_P

दिल्ली : आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या प्रकृतीत सुधारणा; जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट

Rohan_P

परीक्षांसंबंधी आज महत्त्वाचा निर्णय शक्य

Patil_p

श्रीनगर-बारामुल्ला राष्ट्रीय महामार्गावर आढळला IED बॉम्ब

datta jadhav

‘जैश’च्या 3 दहशतवाद्यांचा अवंतीपोरामध्ये खात्मा

Patil_p

राज्यात नव्या 17 रुग्णांची भर

Patil_p
error: Content is protected !!