तरुण भारत

अक्षय कुमार झाला भावूक, टीव्ही अभिनेत्याच्या मृत्यूनंतर तरुणांना केले आवाहन

 

 

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीने गळपास लावून आत्महत्या केली, या घटनेने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्काच बसला. कुशलच्या जवळच्या मित्रमैत्रीणींनी सोशल मीडियाद्वारे दु:ख व्यक्त केले. तसेच कुशलच्या जवळच्या मित्राने गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्याचा सामना करत असल्याचा खुलासा केला. कुशल आणि अक्षयने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंदाज’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.दरम्यान बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने देखील दु:ख व्यक्त करत तरुणांना आवाहन केले आहे.

यावर अक्षय कुमारने तरुणांना आव्हान केलं , आपल्याला मिळालेलं आयुष्य फार सुंदर आहे, आई -वडिलांनी तुमचं पालनपोषण केलेलं असतं .त्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे. पण प्रत्येकाने आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करायला हवा.पण त्यासाठी त्यांनी आपला जीव देणे हे फार चुकीचे आहे.तसेच भारतात नैराश्याचे प्रमाण अधिक आहे ; जर संधी मिळाली तर तो नैराश्यावर चित्रपट करणार असल्याचं ही सांगितलं.

Advertisements

कुशल पंजाबीने १९९५ मध्ये ‘अ माउथफुल ऑफ स्काई’ या मालिकेत काम करत अभिनयाला सुरुवात केली होती. ‘लक्ष्य’,’सलाम-ए-इश्क’,’काल’ या चित्रपटांत कुशलने काम केले आहे. त्यानंतर त्याने कभी हां कभी ना’, ‘ये दिल चाहे मोर’, ‘श्श्श… फिर कोई है’, ‘आसमान से आगे’, ‘झलक दिखला जा 7’, ‘अदालत’, ‘सजन रे झूठ मत बोलो’,‘ईश्क मै मरजावा’ या मालिकांमध्ये काम केले होत.

Related Stories

शाहरुखसोबत दिसणार सान्या मल्होत्रा

Amit Kulkarni

शबरीमला मंदिरात पोहोचला अजय देवगण

Amit Kulkarni

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा बायोपिक लवकरच पडद्यावर

Patil_p

दादरचा फुटपाथ ते वांद्रेतील फ्लॅट

Patil_p

सांग तू आहेस काद्वारे सानिया चौधरीचं मालिका विश्वात पदार्पण

Patil_p

टॉम क्रूजसोबत दिसणार प्रभास

Patil_p
error: Content is protected !!