तरुण भारत

न्यायालयाच्या दडपणामुळेच हेडलॅण्ड सडय़ावरील नाफ्ता खाली करण्यात यश

आता सडय़ावरील इंधन टाक्या हटवण्याची मागणी

प्रतिनिधी/  वास्को

Advertisements

हेडलॅण्ड सडय़ावरील गणेश बॅन्झोप्लास्टच्या टाक्यांमध्ये साठवण्यात आलेला नाफ्ता खाली करण्यात आल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे नगरसेवक मुरारी बांदेकर, लियो रॉड्रिक्स, शशिकांत परब, दामू कासकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. उच्च न्यायालयाच्या दडपणामुळेच नाफ्ता हटवणे शक्य झालेले असून आता सडय़ावरील असुरक्षीत असलेल्या गणेश बॅन्झोप्लास्टच्या टाक्या हटवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांच्यावर नाफ्तासंबंधी करण्यात आलेले आरोपही या नगरसेवकांनी फेटाळले आहेत.

सडय़ावर साठवण्यात आलेला नाफ्ता खास विदेशातून मुरगाव बंदरात आलेल्या ग्लोबल पीक या जहाजात खाली करण्यात आल्याने काल मंगळवारी संध्याकाळी याचिकादार नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन या कृतीचे स्वागत केले. नगरसेवक मुरारी बांदेकर यांनी त्या टाक्यांमधील नाफ्ता पूर्णपणे खाली करण्यात आल्याचे सांगितले. त्या नाफ्ताविरूध्द उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानेच एमपीटीवर दडपण आले व तो नाफ्ता खाली करून त्याची वाहतुक जलमार्गानेच करणे भाग पडलेले आहे असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. नगरसेवक मुरारी बांदेकर यांनी यासंबंधी बोलताना नु शी नलीन जहाज व सडय़ावर साठवण्यात आलेल्या नाफ्ता प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. स्थानिक आमदार, नगरसेवक व नागरिकांचा विरोध असतानाही एमपीटीने कुणालाही न जुमानता सडय़ावरील टाक्यांमध्ये नाफ्ता भरला होता. एमपीटीने दादागीरीची पध्दत अवलंबीली होती. त्यामुळेच आम्हा नगरसेवकांना तो नाफ्ता हटवीण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागली होती. त्यात एमपीटी, गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, डी.आर. पेट्रोकॅमिकल्स यांना प्रतिवादी बनवण्या आले होते. न्यायालयानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत एमपीटी व गणेश बॅन्झोप्लास्ट यांच्यासह प्रतिवादींना कडक शब्दात समज दिली होती. असुरक्षीततेचा आणि बेकायदा साठवणुकीचा मुद्दा न्यायालयानेही उचलून धरला होता. त्यामुळेच याचिकादारांनी केलेल्या मागणीनुसार नाफ्ताचा तो साठा दुसऱया जहाजात लवकर खाली करण्यात यावा व त्याची वाहतुक जलमार्गे करण्यासाठी पावले उचलण्याची सुचना न्यायालयाने एमपीटीला केली होती.

त्यानुसारच मुरगाव बंदरात तो नाफ्ता वाहून नेण्यासाठी ग्लोबल पीक हे जहाज दाखल झालेले असून सडय़ावरील टाक्यांतील नाफ्ता खाली करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता नाफ्तामुळे निर्माण झालेली असुरक्षीततेची भिती दूर झालेली आहे. न्यायालयाचे आणि नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांचेही त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभारी असल्याचे नगरसेवकांनी यावेळी स्पष्ट केले. ही समस्या मिटली असली तरी आता गणेश बॅन्झोप्लास्टच्या असुरक्षीत टाक्या हटवण्यासाठी नगरसेवक व नागरिक आवाज उठवणार आहे. या प्रश्नाचाही पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती नगरसेवक मुरारी बांदेकर व इतर नगरसेवकांनी दिली.

यावेळी बोलताना नगरसेवक शशिकांत परब व लियो रॉड्रिक्स यांनी काँग्रेस नेते संकल्प आमोणकर यांच्यावर नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांची नाफ्ताप्रश्नी बदनामी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. ते स्वता दाबोळीत राहतात, त्यांना सडय़ावरील लोकांच्या सुरक्षेचे काहीच पडलेले नसल्याचे दिसून येते असा आरोप करून नाफ्ता साठवण्याच्या प्रश्नात त्यांचाही हातभार लागलेला असावा अशी शंका शशिकांत परब यांनी व्यक्त केली. नगरसेवक लियो रॉड्रिक्स यांनी संकल्प आमोणकर यांच्यावर काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. दुसऱयांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करताना तो चिखल आमोणकर स्वतावरच उडवून घेत असल्याचे ते म्हणाले. नगरविकासमंत्र्यांवर नाफ्ताप्रकरणी झालेले आरोप या नगरसेवकांनी यावेळी फेटाळले व विरोधकांच्या कृतीचा निषेध केला.

Related Stories

वाळपईतीलच उमेदवारांना नोकऱया देणाऱया आरोग्यमंत्र्यांवर कारवाई करा

Amit Kulkarni

राज्यात 15 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

Amit Kulkarni

शॅकच्या सांडपाण्याची विल्हेवाट पर्यटन खात्याने लावावी

Patil_p

‘आप’ च्या योजनांमुळे पणजीकर प्रभावित

Amit Kulkarni

केरी सातेरी आजोबा देवस्थानच्या गावकर समाजावर अन्याय होत असल्याचा दावा.

Omkar B

गोवा शॉपिंग फेस्टिव्हल फोंडा येथे

Amit Kulkarni
error: Content is protected !!