तरुण भारत

• थर्टीफस्टला तळीरामांनी रिचवले 1 लाख 87 हजार लीटर मद्य

  • प्रतिनिधी / बेळगाव
  • वर्षाचा अखेरचा दिवस साजरा करताना दरवषी तळीरामांच्या झोकांडय़ा वाढतच चालल्या आहेत. यावषी तब्बल 1 लाख 87 हजार 283 लीटर मद्य रिचविले. यामुळे अबकारी खात्याने निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण झाले. तळीरामांच्या या झोकांडय़ांमुळे सरकारला मोठा कर मिळाला आहे. याचबरोबर दारु दुकानदार आणि ठेकेदारांचीही आनंदाच्या झोकांडय़ा वाढल्या. एकूणच 31 डिसेंबर साजरा करताना मद्याच्या विक्रीचा उच्चांक वाढतच चालला आहे. हेच या विक्रीवरुन दिसून येत आहे.
  • अबकारी विभागाच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दिवसभरात संपूर्ण जिल्ह्यात 15 हजार 430 बॉक्स इतकी विस्की व रम खपली आहे. तर 6 हजार 919 बॉक्स बिअर खपली आहे. गेल्या वषीच्या बरोबरीने यंदाही मोठय़ा प्रमाणात दारु खपली आहे. त्यामुळे अबकारी विभागाला सरकारने ठरवून दिलेले उद्दीष्ट 100 टक्के पूर्ण झाले आहे.
  • तळीरामांनी नववर्षाचे स्वागत करताना 1 लाख 33 हजार 315 लीटर मद्य रिचवले आहे. तर 53 हजार 968 लीटर इतकी बिअर खपली आहे. विस्की, रमच्या तुलनेत बिअरचा खप कमी झाला तरी अबकारी विभागाचे उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. केवळ एका दिवसांत जिह्यात 1 लाख 87 हजार 283 लीटर इतकी विस्की व बिअर खपली आहे.
  • डिसेंबर महिन्यासाठी अबकारी विभागाला 2 लाख 97 हजार 239 बॉक्स मद्य खपाविणचे उद्दिष्ट दिले होते. 1 ते 31 डिसेंबरपर्यंत 2 लाख 96 हजार 488 बॉक्स मद्य खपले आहे. त्यामुळे अबकारी विभागाला दिलेले उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. बेळगाव शहर व जिह्यात बिअरपेक्षाही विस्की आणि रम अधिक प्रमाणात खपले. थंडी याला प्रमुख कारण असू शकते, असे अधिकाऱयांनी सांगितले.

Related Stories

एमएलआयआरसीमधून प्रशिक्षणार्थी जवान बेपत्ता

Rohan_P

कोरोना पॉझिटिव्ह असूनही कुटुंबासोबत फिरणाऱ्या व्यक्तीला केलं रुग्णालयात दाखल

Abhijeet Shinde

गोवा एक्स्पेसने जमविला वर्षभरात 42 कोटीचा महसूल

Patil_p

क्रिकेटचा चेंडू चिमुकल्याचा ठरला काळ

Amit Kulkarni

ऑनलाईनद्वारे व्यवसाय परवाना नूतनीकरण सोयीचे

Amit Kulkarni

एक्सेस इलाईट हुबळी, देसाई वॉरियर्स संघ विजयी

Patil_p
error: Content is protected !!