तरुण भारत

कळसा-भांडुरासाठी शेतकऱयांचे पुन्हा आंदोलन

प्रतिनिधी/ बेळगाव

कळसा-भांडुरा प्रकल्पाचा खटला सर्वोच्च न्यायालयात आहे. असे असताना आता पुन्हा शेतकरी कळसा-भांडुराचे पाणी पाहिजे म्हणून आंदोलन करू लागले आहेत. कर्नाटकातील काही भागातील शेतकरी या प्रकल्पासाठी आंदोलन करताना दिसत आहेत. मात्र, खानापूर आणि बेळगाव परिसरातील शेतकऱयांना या प्रकल्पाचा काहीच उपयोग नसल्यामुळे येथील शेतकरी या प्रकल्पाविरोधातच आहेत.

Advertisements

कळसा-भांडुरामुळे बैलहोंगल, हुबळी-धारवाड, गदग परिसरातील शेतकऱयांना त्याचा फायदा होत आहे. मात्र खानापूर, गोवा आणि इतर परिसरातील शेतकऱयांना आणि नागरिकांना त्याचा फटका बसणार आहे. काही संघटना यासाठी आंदोलन करत असल्या तरी त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळणे अशक्मय झाले आहे. बुधवारी कळसा-भांडुरासाठी शेतकऱयांनी कित्तूर चन्नम्मा चौकात व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

यावेळी रयत संघटनेचे चुन्नाप्पा पुजेरी, अशोक यमकनमर्डी, जयश्री गुरण्णावर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.  

Related Stories

कचरा व्यवस्थापन शुल्क रद्दचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱयांकडे

Patil_p

बार असोसिएशन अध्यक्ष निवड बेकायदेशीर

Omkar B

यंदाही विद्यार्थी सायकलपासून वंचित

Amit Kulkarni

आरपीडीमध्ये राष्ट्रीय वाचन सप्ताह

Amit Kulkarni

वाल्मिकी समाजाला 7.5 टक्के आरक्षण देण्याची मागणी

Patil_p

आता राजहंसगडाची महती देशभरात

Amit Kulkarni
error: Content is protected !!