तरुण भारत

नरेंद्र मोदींचे शेतकऱ्यांना नववर्षाचं गिफ्ट, खात्यात जमा करणार १२ हजार कोटी

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकमधील तुमकूर येथे दौऱयावर आहेत. दौऱयाच्या पहिल्या दिवशी शेतकऱयांना नववर्षानिमित्त भेट देणार आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱयांच्या खात्यात 12 हजार कोटी जमा केले जाणार आहेत. जवळपास आठ कोटी शेतकऱयांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात हे पैसे शेतकऱयांच्या खात्यात ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा करताना लाभार्थी शेतकऱयांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील अशी घोषणा केली होती. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात त्यावेळी एक कोटी शेतकऱयांच्या खात्यात जवळपास दोन हजार कोटी रुपये जमा करण्यात आले होते.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुमकुरुमध्ये सभा होणार असून या सभेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता (डिसेंबर 2019 ते मार्च 2020) चा शुभारंभ करणार आहेत. तसेच कर्नाटकला कृषि कर्मण पुरस्कार देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते देण्यात येणार आहे. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरपा आणि श्री सिद्धलिंगेश्वर स्वामी देखील उपस्थित राहणार आहे.

 

Related Stories

कोरोना संकटात 80 लाख भारतीयांनी EPFO मधून काढले तब्बल 30 हजार कोटी

datta jadhav

देशात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाण 27.52 टक्के 

pradnya p

बिहारमध्ये कोरोनाचे थैमान

Patil_p

5 एप्रिलला रात्री 9 वाजता लाईट बंद करून घरोघरी दिवे लावू या : पंतप्रधान

prashant_c

3727 बांगलादेशींची 3 वर्षांमध्ये हकालपट्टी

Patil_p

उत्तराखंड सरकारकडून खाजगी लॅब, रुग्णालयात कोरोना चाचण्यांसाठीचे दर निश्चित

pradnya p
error: Content is protected !!