तरुण भारत

प्रकाश काशीद गुरुमाउली पुरस्काराने सन्मानित

वार्ताहर /कारदगा :

येथील साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष व कसनाळ प्राथमिक शाळेचे शिक्षक प्रकाश काशीद यांना शिवम सामाजिक व शैक्षणिक संस्था राशीवडे बुद्रुक यांच्यावतीने गुरुमाउली पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथील राम गणेश गडकरी हॉलमध्ये लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे-औरंगाबाद यांच्या हस्ते हा देण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी शिक्षण उपसंचालक संपतराव गायकवाड होते. प्रकाश काशीद हे शिक्षकी पेशाबरोबरच गत 25 वर्षे कारदगा येथे भरविण्यात येणाऱया ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी एकपात्री प्रयोग सादर करून समाज प्रबोधनाचे कार्य करत आहेत. याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या महापौर सुरमंजिरी लाटकर, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, शिवम संस्थेचे अध्यक्ष दिगंबर टिपूगडे, धनेश बोरा, प्रा. आण्णासाहेब भागाजे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

पहिल्या रेल्वेगेटनजीकच्या दुभाजकाचा वाहनधारकांना फटका

Amit Kulkarni

मुंगेत्री नदीच्या अस्तित्वासाठी नियोजन करण्याची गरज

Amit Kulkarni

बेंगळूर पोलीस प्रमुखांनी १५ ऑगस्ट पर्यंत कर्फ्यू वाढविला

Abhijeet Shinde

मद्यांची दुकाने चकाचक ठेवा अन्यथा होणार कारवाई

Patil_p

‘त्या’ गवळी कुटुंबीयांची आणखी एक म्हैस दगावली

Amit Kulkarni

खडकलाट पोलिसांकडून 20 दुचाकी जप्त

Patil_p
error: Content is protected !!