तरुण भारत

गोमंतक मराठा समाजातर्फे 7 रोजी महिला सशक्तीकरण कार्यक्रम

प्रतिनिधी /पणजी:

 गोमंतक मराठा समाजातर्फे गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री स्व. शशिकलाताई काकोडकर यांच्या जयंतिप्रित्यर्थ 7 जानेवारी रोजी ‘महिला सशक्तीकरण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गोमंतक मराठा समाजाचे अध्यक्ष गोरख मांद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंगळवार दि. 7 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वा. उद्घाटन सोहळा होणार आहे. यावेळी उद्घाटक म्हणून ज्येष्ठ सामाजसेवक डॉ. रामकृष्ण मोरजकर तर खास निमंत्रित म्हणून उद्योजक यतिन काकोडकर उपस्थित असणार आहे. तद्नंतर सकाळी 10 वा. ‘महिला सशक्तीकरण’ व शशिकलाताई काकोडकर जीवन व कार्य या विषयावर अखिल गोवा महिला पंच मर्यादित वत्कृत्व स्पर्धा असणार आहे.

सकाळी 11.30 वा. शशिकलाताई काकोडकर जीवन व कार्य या विषयावर परिसंवाद असणार असून यात अध्यक्ष म्हणून माजी आमदार धर्मा चोडणकर, माजी मंत्री निर्मला सावंत, महिला बाल विकास खात्याच्या संचालिका दिपाली नाईक व ज्येष्ठ पत्रकार नीना नाईक यांचा सहभाग असणार आहे.

दुपारी 12 वा. स्पर्धाचा बक्षिस वितरण व सत्कार सोहळा होणार आहे. यावेळी ज्येष्ट समाजसेविका कमलिनी रमाकांत पैगीणकर व समाजसेविका डॉ. आशा विश्वनाथ सावर्डेकर यांचा सत्कार केला जणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, सन्माननीय पाहुणे म्हणून माजी कायदा मंत्री दयानंद नार्वेकर व विशेष निमंत्रित म्हणून यतिन काकोडकर उपस्थित राहणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष गोरख मांदेकर यांनी केले आहे. यावेळी गोमंतक मराठा समाजाचे उपाध्यक्ष नंदकिशोर शिरगावकर, खजिनदार उमाकांत धारगळाकर व सचिव प्रशांत मांदेकर उपस्थित होते.

Related Stories

समाजाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा ‘व्हॅलेंटाईन डे’

Shankar_P

मार्केट संकुलातील व्यापाऱयांवर नुकसानीचे सावट

Patil_p

बेतकी खांडोळा येथे दूधवाहू कंटेनरने दुचाकीला ठोकरल्याने एक ठार

Patil_p

दहावी परीक्षांचे वेळापत्रक दहा दिवस अगोदर जाहीर करणार

Patil_p

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांनी आजपासून कामावर हजर व्हावे

Omkar B

आयआयटी मेळावलीतच!

Omkar B
error: Content is protected !!