तरुण भारत

दिल्ली, प.बंगालमध्ये भाजपचीच सत्ता येणार : अमित शाह

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे सर्वांनाच वेध लागले असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.

Advertisements

दिल्लीत एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शाह म्हणाले, दिल्ली विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यासाठी आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. दिल्लीकरांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अरविंद केजरीवाल अपयशी ठरले. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपच जिंकेल. पश्चिम बंगालमध्ये तर भाजप स्पष्ट बहुमतात सरकार स्थापन करणार असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रानंतर झारखंडमध्येही भाजपला सत्ता गमवावी लागली आहे. झारखंडमध्ये विकासकामे करुनही भाजपला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे झारखंडमधील पराभवाची समिक्षा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

यूपी बोर्डाकडून परीक्षांची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी सुरू होणार 10वी,12 वीची परीक्षा

Rohan_P

‘हायड्रोक्‍सीक्‍लोरोक्वीन’च्या चाचण्यांना WHO चा ब्रेक

datta jadhav

नवी दिल्ली : मिग-29 विमान दुर्घटनेतील बेपत्ता पायलटचा मृतदेह सापडला

datta jadhav

‘भारत बंद’ शांततेत, प्रतिसाद संमिश्र

Patil_p

भारत-अमेरिकेत उद्या ‘टू प्लस टू’ चर्चा

datta jadhav

वायदे बाजारात सोने-चांदीचे दर घसरले

datta jadhav
error: Content is protected !!