तरुण भारत

अनुराधा पौडवाल माझी आई, केरळमधल्या महिलेचा दावा

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

ज्येष्ठ गायिका अनुराध पौडवाल यांच्यावर केरळच्या महिलेनं धक्कादायक आरोप केले आहेत. त्या म्हणतात, अनुराधा पौडवाल माझी आई आहे. तसेच या महिलेने कौटुंबिक न्यायालयात अनुराध पौडवाल यांच्याविरोधात खटला दाखल केला असून 50 कोटींची भरपाई द्या अशीही मागणी केली आहे. करमाला मोडेक्स असं या महिलेचं नाव आहे. करमाला तिरुअनंतपुरमची रहिवासी आहे.

Advertisements

त्या म्हणतात, मी अवघी चार वर्षांची असताना अनुराध पौडवाल यांनी मला पोन्नाचन आणि ऍग्नेस या दाम्पत्याला दत्तक दिले. अनुराध पौडवाल यांनी जर माझा दावा फेटाळला तर मी डीएनए टेस्टसाठीही तयार आहे, ज्यानंतर सगळं काही सिद्ध होईल.

पुढे त्या म्हणतात, माझे वडील लष्करात होते. अनुराध पौडवाल यांचे ते चांगले मित्र होते. कालांतराने त्यांची बदली केरळमध्ये झाली. अनुराध त्यावेळी आपल्या करिअरमध्ये व्यस्त होत्या आणि बाळाची जबाबदारी घेण्याची त्यांची तयारी नव्हती, त्यामुळे त्यांनी मला ऍग्नेस यांच्याकडे सोपवले. वडिलांकडून त्यांच्या मृत्यूपूर्वी मी सत्य ऐकले. त्यानंतर अनुराध पौडवाल यांच्याशी बऱयाचदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही.

 

Related Stories

कलाकाराच्या पत्नीची द्विधा मन:स्थिती द आर्टिस्ट वाईफ

Patil_p

‘आब्रा-का-डाब्रा’ची जादू निर्माता, दिग्दर्शकांवर पाडणार भुरळ!

Patil_p

अमेरिकेच्या रॉकेट हल्ल्यात इराणचा मेजर जनरल सुलेमानी ठार

prashant_c

माझ्या भाषणाचे अर्थ-अनर्थ काढले : जितेंद्र आव्हाड

prashant_c

अनुष्का येणार मैदानावर

Patil_p

‘फक्त मराठी’ वाहिनीवर मराठी चित्रपटांचा खजिना

Patil_p
error: Content is protected !!